कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मैदान खेळाडूंना वरदान,पण.. राजोपाध्येनगरच्या विकासाकडे दुर्लक्ष

01:13 PM May 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / इम्रान गवंडी :

Advertisement

 महापालिकेच्या कॉम्रेड गोविंद पानसरे विद्यालयासमोर असणारे राजोपाध्येनगर मैदान येथील विद्यार्थ्यांसह परिसरातील खेळाडूंसाठी वरदान ठरले आहे. महापालिका शाळेसह इतर खासगी शाळांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे या मैदानावर आयोजन केले जाते. धार्मिक कार्यक्रमांसह हंगामी क्रिकेट, फुटबॉल स्पर्धाही या मैदानावर भरवल्या जातात. महिला, ज्येष्ठ नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी मैदान सुरक्षित आहे. पण या लाभदायक असलेल्या मैदानाच्या संवर्धन आणि विकासाचा प्रश्न वर्षानुवर्षे रखडला आहे. याकडे प्रशासन लक्ष देणार कधी? असा प्रश्न खेळाडू, नागरिकांतून केला जात आहे.

Advertisement

राजोपाध्येनगर मैदान म्हणून परिचित असलेल्या मैदानावर अनेक क्रीडा स्पर्धा झाल्या. सध्या, मैदानाचे सपाटीकरण सुस्थितीत असले तरी मैदानाभावेती स्टेडियम आणि संरक्षक भिंतीचे काम अर्धवट आहे. स्टेडियम आणि पायऱ्या बांधण्यासाठी 70 लाख रूपयांचा निधी मिळाला होता. त्यानंतर मात्र, निधीअभावी हे काम अनेक वर्षापासून रखडले आहे. स्टेडियमच्या पायऱ्या आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला होता. हाही निधी संपल्याने काम रखडले आहे. पायऱ्यांची दुरावस्था झाली आहे. एका बाजूला अर्धवट संरक्षक भिंत पुर्णपणे उभारण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनासह आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

मैदानामध्ये वॉकींग टॅक तयार करण्यासाठी 8 वर्षापूर्वी 15 लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्याची वर्कऑर्डरही निघाली होती. कंत्राटदाराने कामाची सुरूवातही केली होती. मात्र, काही कारणास्तव त्याचे काम थांबवण्यात आले. ते अद्यापही थांबलेलेच आहे. मैदानाच्या एका बाजूला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसवलेल्या व्यायामाच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. तरीही स्थानिक नागरिक त्याचा वापर करत आहेत.

मैदानाच्या एका बाजूला असणाऱ्या मनपा कॉम्रेड पानसरे विद्यालयाच्या इमारती शेजारी सुमारे 65 फुट रूंद आणि 25 फुट खोल खड्डा आहे. येथे लहान मुले खेळत असताना इजा पोहचण्याचा धोका वाढला आहे. याचे सपाटीकरण झाल्यास मैदानाचा आणखी विस्तार होऊ शकतो.

मैदानाच्या एका बाजूला महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम करण्यासाठी ओपन जीम बसवण्यात आले आहेत. यातील काही साहित्य गंजलेले आहे. ते केंव्हाही मोडकळीस येण्याची शक्यता आहे. त्याची देखभाल करणे गरजेचे आहे.

सध्या बसवलेल्या दिव्यांचा प्रकाश कमी पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. अंधाराचा फायदा घेत या परिसरात मद्यपींचा वावर वाढला आहे.

सकाळी ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात. प्रमुख मार्गावरून फिरत असताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी मैदानावर वॉकींग ट्रॅक तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सकाळी फिरणे अधिक सुरक्षित होणार आहे. मात्र, निधीअभावी हे काम रखडले आहे.

मैदानाच्या विकास कामांकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजचे आहे. परिसरामध्ये एकमेव असे हे मैदान आहे. ज्याचा लाभ येथील खेळाडूंना होत आहे. मात्र, येथील रखडलेली विकासकामे होण्याची गरज आहे. हायमास्ट लाईट, मैदानाचा विस्तार, वॉकींग ट्रॅक, सपाटीकरण आदी कामे करण्याची गरज आहे.

                                                                                                                         - संजय सावंत, माजी नगरसेवक

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article