वाहन क्षेत्रात तेजी, प्रमुख कंपन्यांचा टीकाव लागेल
जागतिक तणाव, वाढता खर्च- पुरवठा साखळीतील चिंता हळूहळू वाढत असल्याचे चित्र
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय वाहन क्षेत्र सध्या अशा गतीने वाटचाल करत आहे, जे वरवर पाहता खूप मजबूत दिसते. सर्वत्र विक्री वाढत आहे, कंपन्या नवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत आणि मागणीत कोणतीही मोठी नकारात्मकता नाही. पण प्रश्न हा आहे की ही तेजी जास्त काळ टिकेल का आणि त्यामागील छुपे धोके अजून समोर यायचे आहेत हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.
दरम्यान देशात सणासुदीच्या दिवसांतील मागणी, गावांमध्ये सुधारलेली परिस्थिती आणि ग्राहकांच्या वाढलेल्या खरेदीने या क्षेत्राला मजबूत आधार दिला आहे. पण या तेजीमागे एक वेगळीच कहाणी सुरू आहे, जिथे जागतिक तणाव, वाढता खर्च आणि पुरवठा साखळीतील चिंता हळूहळू वाढत असल्याचे चित्र निर्माण होत असल्याने वाहन क्षेत्रातील कंपन्यांना बळकटी येणार का हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.
प्रत्येक विभागात वाढ, बाजारात उत्साह
अॅक्सिस डायरेक्टच्या अहवालानुसार, दुचाकींच्या विक्रीत सुमारे 12 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आणि एकूण विक्री 1.8 कोटी युनिट्सवर पोहोचली. टीव्हीएस आणि आयशर मोटर्सने सर्वोत्तम कामगिरी केली, तर हिरो मोटोकॉर्पनेही स्थिर वाढ कायम राखली. तीन चाकी वाहनांच्या विभागात तर अधिकच मोठी वाढ दिसून आली, जिथे विक्रीत जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झाली.
या विभागात टीव्हीएस आणि एम अँड एम आघाडीवर आहेत. कार बाजारपेठही मागे राहिली नाही. एकूण विक्री सुमारे 9 टक्क्यांनी वाढली, ज्यात टोयोटा, एम अँड एम, एमजी मोटर, किया आणि टाटा मोटर्स यांनी दमदार कामगिरी केली, तर मारुती सुझुकीची वाढ मर्यादित होती आणि ह्युंदाई मागे राहिली.
ट्रक, बस व ट्रॅक्टरला जोरदार मागणी
वस्तू-सेवा करप्रणी
व्यावसायिक वाहने म्हणजेच ट्रक आणि बस यांची मागणीही जोरदार राहिली. यात सुमारे 11 टक्क्यांची वाढ दिसून आली, जी वाढलेली मालवाहतूक आणि जुन्या वाहनांच्या बदलीमुळे झाली आहे. ट्रॅक्टर विभागातही जोरदार तेजी होती. ग्रामीण मागणी, चांगल्या पिकाची अपेक्षा आणि पाण्याची सुधारलेली परिस्थिती यामुळे विक्रीला चालना मिळाली. एम अँड एम, एस्कॉर्ट्स आणि व्हीएसटी सारख्या कंपन्यांनी येथे चांगली कामगिरी केली.