होंडा अॅक्टिव्हा-ई आणि क्यूसी1 चे बुकिंग सुरु
पूर्ण चार्जवर 102 किमी रेंज : 80 केएमपीएच टॉप स्पीड
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटरर्स इंडिया यांनी अॅक्टिव्हा-ई आणि क्यूसी1 यांचे बुकिंग 1 जानेवारीपासून सुरु केले आहे. कंपनीने नोव्हेंबर 2024 मध्ये भारतात दोन्ही ईव्ही सादर केल्या होत्या. अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक हे बेंगळूर दिल्ली, मुंबई येथील निवडक डीलरशिपवर बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच क्यूसी1 दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळूर, हैदराबाद आणि चंदीगडमध्ये बुकिंगसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना हि सेवा 1,000 रुपयांच्या टोकन रकमेवर बुकि करता येऊ शकते. दोन्ही मॉडेल्सना किंमत या महिन्यात ग्लोबल एक्स्पोमध्ये जाहीर केली जाणार आहे. तर सदर गाडींचे वितरण हे फेब्रुवारीमध्ये सुरु होणार आहे. दोन्ही ईव्ही सध्याच्या ए1 रेंजला टक्कर देणार आहे.
अॅक्टिव्हा ई ला स्वॅप करण्यायोग्य बॅटरी मिळेल आणि क्यूसी1 ला फिक्स्ड बॅटरी पॅक पर्याय मिळेल. कंपनीचा दावा आहे की, अॅक्टीव्हा ई 80 किमीचा टॉप स्पीड मिळवू शकते आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 102 किमी धावेल. त्याच वेळी, क्यूसी1 पूर्ण चार्ज केल्यावर 80 किमीची श्रेणी आणि 50 किमी प्रतितास असा टॉप स्पीड असेल. होंडा 3 वर्षे/50,000 किमीची वॉरंटी, तीन मोफत सेवा देत आहे. ही वॉरंटी ऑफर ईव्ही खरेदीदारांसाठी पहिल्या एका वर्षासाठी आहे. होंडा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक आणि क्यूसी1 ही प्रगत आणि आकर्षक डिझाइन असलेली ईव्ही आहे. दोन्ही ईव्हीचे डिझाइन सारखेच आहे, फक्त क्यूसी1 च्या मागील चाकामध्ये हब मोटर आहे. त्याच वेळी, अॅक्टिव्हा ई मध्ये मागील चाकाच्या बाजूला एक इलेक्ट्रिक मोटर बसवली आहे.