डॉ. किरण ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे विद्यालयात पुस्तक वाटप
सावंतवाडी । प्रतिनिधी
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉ. किरण ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनता विद्यालय, तळवडे येथे लोकमान्य सोसायटी आणि लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी पुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी लोकमान्य सोसायटीचे सीनियर मॅनेजर महेश तानावडे, एज्युकेशन विभागाचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर, मार्केटिंग मॅनेजर सौ. साक्षी मयेकर, मॅनेजर सौ. अर्चना सरनाईक, शाखा व्यवस्थापक अरविंद परब, सहव्यवस्थापक (एच.आर.) . श्रावण धोंड, मयूर पिंगुळकर, श्रेया पासते, गौरी जुवेकर, जानू पाटील तसेच जनता विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन ज्ञानवृद्धीला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. डॉ. ठाकूर यांच्या सामाजिक जाणिवेचा आणि समाजासाठी केलेल्या कार्याची जाणीव करून देणारा हा उपक्रम आहे असे मत व्यक्त करण्यात आले यावेळी लोकमान्य एज्युकेशनचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुस्कर यांनी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले तसेच माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या कॉलेज विषयीही माहिती सांगितली .