रोटरी अन्नोत्सवमध्ये ‘बुगी वुगी’ नृत्य स्पर्धेला रसिकांची दाद
बेळगाव : तमाम बेळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेल्या रोटरी अन्नोत्सवमध्ये ‘बुगी वुगी’ नृत्य स्पर्धेला रसिकांनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहून दाद दिली. या स्पर्धेत व्हीके स्टाईल संघाने प्रथम, आरएनव्ही डान्स व्रु ने द्वितीय व बुगी मॅनियॅक अँड अभिनय डान्स अकॅडमी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कथ्थक नृत्य तज्ञ अनुजा क्षीरसागर, फरहान डान्सचे फरहान सय्यद व नृत्य दिग्दर्शक शाकीब यांनी काम पाहिले. याप्रसंगी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचे अभिनंदन केले व अन्नोत्सवाच्या आयोजकांची प्रशंसा केली. यावेळी संकल्प जगदीश शेट्टर व श्रद्धा शेट्टर हेसुद्धा उपस्थित होते. अन्नोत्सवामध्ये शाफिकभाई लाहोरी यांच्या स्टॉलवर रुमाली रोटीसमवेत मटण निहारी व ब्लॅक मटण यांची चव चाखायलाच हवी. शुक्रवार दि. 10 रोजी सुफी गायन होणार आहे. गायनासमवेत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी बेळगावकरांनी अन्नोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.