कलंबिस्त येथे दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना बोनस वाटप
सावंतवाडी । प्रतिनिधी
कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त या संस्थेतर्फे दुग्ध व्यवसायिक २० शेतकऱ्यांना बोनस वितरण करण्यात आला. येत्या नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांसाठी खास कर्ज व बँक योजनेची माहिती तसेच दुधाळ गाई म्हशींच्या योजनांबाबतची माहिती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे असे घेण्यात आलेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. संस्थेच्या दूध केंद्रामध्ये पाडवा दिवाळी दिवशी सायंकाळी बैठक झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन. ॲड संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांना बोनसचे वाटप करण्यात आले . यावेळी सचिव रमेश सावंत,संचालक लक्ष्मण राऊळ ,दत्ताराम कदम, राजन घाडी, सिप्रायान रोड्रिक्स , स्वप्निल सावंत, संजय म्हाडगूत, दाजी कुडतरकर, राजन सावंत. सिद्धेश सावंत,श्री पवार ,सामाजिक कार्यकर्ते सुरेश उर्फ आबा सावंत, प्रकाश सावंत, श्री सावंत ,श्री आनंद बिडवे आधी उपस्थित होते.यावेळी चेअरमन. ॲड संतोष सावंत यांनी दरवर्षी गोकुळच्या मार्फत शेतकऱ्यांना बोनस देण्यात येतो. बँक खात्यामध्ये थेट बोनस जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा . गोकुळ व जिल्हा बँक च्या मार्फत शेतकऱ्यांना दुधाळ गाई - म्हशींसाठी कर्ज योजना उपलब्ध आहेत . त्याचा लाभ येथील शेतकऱ्यांनी घ्यावा. त्यासाठी येत्या नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांसाठी खास प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांची आरोग्य तपासणी उपक्रमही राबविण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सचिव रमेश सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.