बॉम्बे शेविंगचा येणार आयपीओ
गुरुग्राम : वैयक्तिक काळजीची उत्पादने विक्री करणाऱ्या बॉम्बे शेविंग कंपनीचा लवकरच आयपीओ येणार आहे. अलीकडेच बॉम्बे शेविंग कंपनीने 136 कोटी रुपयांची उभारणी केली असल्याचे समजते. या कंपनीमध्ये माजी क्रिकेट खेळाडू राहुल द्रवीड यांनीही गुंतवणूक केल्याचे समजते. गुरुग्राममध्ये स्थित असणारी बॉम्बे शेविंग कंपनी यांनी 550 कोटी रुपयांचा महसूल आर्थिक वर्ष 2025 मध्ये प्राप्त केला होता. कंपनी आता आयपीओ सादर करण्याच्या प्रयत्नात असून येणाऱ्या काळामध्ये विविध उत्पादने सादर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
कंपनीबद्दल..
बॉम्बे शेविंगची स्थापना 2016 मध्ये शंतनू देशपांडे यांनी केली होती. शेविंग क्रीमसह ट्रीमर्स, इलेक्ट्रीक शेवर्स व इतर उत्पादने कंपनी विक्री करते. फिलिप्स आणि जिलेट यासारख्या कंपन्यांना टक्कर देणार आहे. सीईओ तथा संस्थापक शंतनू देशपांडे म्हणाले, येणाऱ्या काळात कंपनी ग्राहकांच्या मागणीवर लक्ष केंद्रीत करुन उत्पादने बनवणार आहे.