अयोध्येच्या कॉलेजात बाँब प्रशिक्षण
► वृत्तसंस्था
अयोध्या
अयोध्येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात बाँब निर्माण करण्याचे प्रशिक्षण देणारी कागदपत्रे सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात या महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत असणाऱ्या एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. राजर्षी दशरथ स्वायत्त वैद्यकीय महाविद्यालय असे या संस्थेचे नाव आहे. ही कागदपत्रे महाविद्यालयाच्या एक्स रे कक्षातून हस्तगत करण्यात आली आहेत. त्यांची माहिती प्रथम एक्स रे विभागाच्या प्रमुखांना मिळाली. त्यांनी त्वरित पोलिसांना सावध केले. पोलीसांनी वेगाने हालचाल करुन ती हस्तगत केली आणि तपासास प्रारंभ केला. ही कागदपत्रे सर्फराज या विद्यार्थ्याने तयार केल्याचे उघड झाल्यानंतर त्याला चौकशीसचठी ताब्यात घेण्यात आले. तो उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यात राहणारा आहे. त्याच्यासह आणखी दोघांकडेही चौकशी केली जात असून पोलिसांनी भीषण संभाव्य दुर्घटना टाळल्याचे दिसून येत आहे.