विमानांमध्ये बॉम्बच्या धमकींचे सत्र कायम
6 दिवसात 70 हून अधिक घटना : प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तपासणी
वृत्तसंस्था/ श्रीनगर
विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्मया मिळण्याच्या घटना थांबताना नाहीत. शनिवारीही अनेक विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्मया मिळाल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. बॉम्बच्या धमक्मया मिळालेल्या फ्लाईट्सपैकी तीन इंडिगो एअरलाईन्सच्या असून काही विमाने आकासा एअरलाईन्सची आहेत. गेल्या सहा दिवसात 70 हून अधिक घटना उघड झाल्या असून 30 विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली. प्राधिकरणाकडून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असल्याने धमक्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
देशात सातत्याने विमाने उडवण्याच्या धमक्मया येत आहेत. गेल्या 5-6 दिवसात 70 विमानांना बॉम्बच्या धमक्मया मिळाल्या आहेत. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्यामुळे लोक आपल्या घरी पोहोचण्यासाठी विमानाने प्रवास करत आहेत. मात्र अशा धमक्मयांमुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी ऊग्णालये आणि शाळांना बॉम्बच्या धमक्मया आल्या होत्या. बॉम्ब ठेवल्याची धमकी प्राप्त झाल्यामुळे विमानांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागते. किंवा प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करावी लागत असल्यामुळे विमान कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढत चालला आहे. धमक्यांचे सत्र वाढल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा ताण कंपन्यांना सहन करावा लागत आहे.