For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीच्या 2 शाळांना बॉम्बची धमकी

06:43 AM Sep 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीच्या 2 शाळांना बॉम्बची धमकी
Advertisement

नवी दिल्ली : दिल्लीतील दोन शाळांना मंगळवारी बॉम्बची धमकी प्राप्त झाली. या धमकीची माहिती कळताच शाळा प्रशासनाने परिसर रिकामी करविला आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी पोहोचविले. तर धमकी मिळाल्यावर सुरक्षा यंत्रणांना कळविण्यात आले आणि शाळा परिसराची पूर्ण तपासणी करविण्यात आली. या तपासणीत काहीच संशयास्पद आढळून आलेले नाही. तपास यंत्रणा आता ही धमकी कुणी दिली याचा शोध घेत आहेत.

Advertisement

Advertisement

.