कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एअर इंडिया विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी

06:55 AM Jun 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग : फुकेतमधून येत होते नवी दिल्लीत : भारतीय दूतावास थायलंड अधिकाऱ्यांच्या संपर्कात

Advertisement

वृत्तसंस्था/ फुकेत

Advertisement

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त होण्याची घटना ताजी असतानाच थायलंडमधून भारतात येणाऱ्या एका विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यामुळे शुक्रवारी खळबळ उडाली. फुकेत येथून 156 प्रवाशांना घेऊन नवी दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतीय दुतावास अधिकारी थायलंडमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवत आहेत.

एअर इंडियाचे विमान एआय-379 फुकेतहून नवी दिल्लीला निघाले होते. त्यात 156 प्रवासी होते. परंतु उ•ाणानंतर बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर, अंदमान समुद्राभोवती प्रदक्षिणा घालून विमान परतले आणि आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. लँडिंगनंतर प्रवाशांना विमानातून बाहेर काढून तपासणी करण्यात आली. मात्र, कोणतीही स्फोटकजन्य वस्तू सापडली नाही. या घडामोडीदरम्यान सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती विमान प्राधिकरणाकडून देण्यात आली.

सर्व 156 प्रवासी सुरक्षित

विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याचे नियोजन केले. विमानतळ आकस्मिक योजना (एसीपी) सक्रिय केल्यानंतर विमान एआय-379 सुरक्षितपणे उतरवण्यात आले. सदर विमानात 156 प्रवासी होते. फ्लाइट ट्रॅकर फ्लाइटराडार 24 नुसार, शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता (02:30 जीएमटी) विमानाने फुकेत विमानतळावरून दिल्लीसाठी उ•ाण केले, परंतु अंदमान समुद्राभोवती मोठा वळसा घेतल्यानंतर ते माघारी फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतले.

मुंबई-लंडन विमानातही व्यत्यय

शुक्रवारी अन्य एका घटनेत लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान तीन तास हवेत राहिल्यानंतर मुंबईत उतरवण्यात आले. हे विमान मुंबईहून लंडनला जात होते. या विमानाने सकाळी 5.39 वाजता उ•ाण केले. इराणमधील परिस्थिती आणि त्यांचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे अनेक उ•ाणांचे मार्ग बदलले जात आहेत किंवा विमाने त्यांच्या मूळ गंतव्यस्थानावर परत उतरवली जात आहेत, असे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article