इस्त्रायलहून ऑस्ट्रिया जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी
लढाऊ विमानाच्या देखरेखीत इमर्जन्सी लँडिंग
सोफिया : इस्त्रायलहून ऑस्ट्रिया येथे जाणाऱ्या ऑस्ट्रियन एअरलाइन्सच्या विमानाला बॉम्बच्या धमकीनंतर बुल्गारिया येथे उतरविण्यात आले. एअरबस ए320 विमान रविवारी रात्री तेल अवीव येथून व्हिएन्नासाठी रवाना झाले होते. धोक्याची माहिती मिळताच बुल्गारियाच्या वायुदलाने विमानाला एस्कॉर्ट करण्यासाठी मिग-29 लढाऊ विमाने रवाना केली. तर ऑस्ट्रियन एअरलाइन्सच्या विमानात 51 प्रवासी आणि चालक दलाचे 6 सदस्य होते. लँड झाल्यावर या सर्वांना विमानातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. विमान रविवारी संध्याकाळी 6.46 वाजता तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावरून रवाना झाले होते. विमान रोमानियाच्या आकाशात असताना ते बुल्गारियाची राजधानी सोफियाच्या दिशेने वळविण्यात आले. सुमारे तीन तासांनी सोफियाच्या वासिल लेव्स्की विमानतळावर विमान उतरले. तर अलर्ट मिळाल्याच्या सुमारे 30 मिनिटांनी विमानाची सुरक्षा तपासणी सुरू झाली. या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली होती.
