महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एअर इंडिया विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी

07:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिरुअनंतपुरम विमानतळावर आणीबाणी घोषित : 135 प्रवासी सुरक्षित

Advertisement

वृत्तसंस्था/तिरुअनंतपुरम

Advertisement

मुंबईहून तिरुअनंतपुरमला पोहोचणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने यंत्रणांची तारांबळ उडाली. विमान तिरुअनंतपुरमला पोहोचत असतानाच बॉम्बसंबंधी माहिती मिळाली. त्यानंतर विमानतळावर आणीबाणी जारी करत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून विमानाची तपासणी करण्यात आली. यावेण आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले होते. याप्रसंगी विमानात 135 प्रवासी होते. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर सर्व प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीत चिंतेचे काहीही समोर आले नसल्याचेही प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. गेल्या तीन महिन्यांत विमानात बॉम्बची धमकी देण्याची ही सहावी घटना आहे. यापूर्वी जूनमध्ये तीन आणि मे महिन्यात दोन फ्लाईटमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article