For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळूर स्फोटाला अपयश आल्यानेच रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट

06:24 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंगळूर स्फोटाला अपयश आल्यानेच रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट
Advertisement

दोन्ही संशयित दहशतवाद्यांकडून तपासादरम्यान खुलासा

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

मंगळूर येथील कुकर बॉम्बस्फोटात अपेक्षेप्रमाणे यश न आल्याने बेंगळुरातील व्हाईटफिल्डच्या रामेश्वरम पॅफेत बॉम्बस्फोट केल्याचा खुलासा दोन्ही संशयित दहशतवाद्यांनी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासादरम्यान केला आहे. मंगळूर कुकर बॉम्बस्फोटात अपेक्षेइतके यश मिळाले नाही. ऑटोमधून प्रवास करताना अचानक बॉम्बचा स्फोट झाल्याने मोहम्मद शारिकला अटक करण्यात आली होती. त्यामुळे यात अपेक्षेप्रमाणे यश न आल्याने आपण स्वत: मैदानात उतरून रामेश्वरम पॅफेत बॉम्बस्फोट घडविल्याचे संशयित दहशतवादी मुसावीर हुसेन शाजीब आणि अब्दुल मतीन अहमद ताहा यांनी सांगितले आहे, असे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.

Advertisement

रामेश्वरम पॅफे बॉम्बस्फोटाबाबत एनआयए अधिकाऱ्यांनी मोहम्मद शारिकची चौकशी केली असता त्याने मुसावीर हुसेन शाजीब आणि अब्दुल मतीन अहमद ताहा यांची नावे सांगितली होती. त्यामुळे एनआयएच्या अधिकाऱ्यांना तपासाला गती देण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथील बॉम्बस्फोटात आयएस संशयित जमेश मुबीन  मारला गेला होता. त्यामुळे यामध्येही यश आले नव्हेत. आयईडी बनवण्यात निपुण असलेल्या जमेश मुबीनचा मृत्यू झाल्यामुळे संशयितांनी आपली पिछेहाट झाल्याचे संबोधले होते.

Advertisement
Tags :

.