For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलकात्यात बॉम्बस्फोट, महिलेसह दोघे जखमी

06:30 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोलकात्यात बॉम्बस्फोट  महिलेसह दोघे जखमी
Advertisement

एसएन बॅनर्जी रोडवर दुर्घटना : परिसर सील

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

कोलकात्याच्या एसएन बॅनर्जी रोडवर शनिवारी दुपारी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात महिलेसह दोघे जखमी झाले आहेत. कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लोचमन स्ट्रीट आणि एसएन बॅनर्जी रोड दरम्यान हा स्फोट झाला. दुर्घटनेनंतर तत्काळ बॉम्बशोधक व निकामी पथकाला (बीडीडीएस) पाचारण केल्यानंतर पथकाने तेथे ठेवलेल्या बॅगेची तपासणी करत संपूर्ण परिसर सील केला.

Advertisement

कोलकात्यात शनिवारी दुपारी 1:45 वाजता ब्लोचमन स्ट्रीट आणि एसएन बॅनर्जी रोड दरम्यान बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 54 वषीय बिपा दास ही कचरावेचक महिला आणि अन्य एक पादचारी असे दोघे जखमी झाले. कचऱ्यातून पिशवी उचलताच त्याचा स्फोट झाला. स्फोटामुळे महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तिची बोटेही जळून गेली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  स्फोटाचा आवाज खूप मोठा होता, असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले. स्फोट झाला तेव्हा आम्ही जवळच उभे होतो. आम्ही ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता कचरावेचक महिला रस्त्याशेजारी पडलेली दिसली. या व्यक्तीच्या उजव्या हाताच्या मनगटापर्यंत जखम झाली होती, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

या दुर्घटनेबाबत केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी राज्य सरकारला धारेवर धरताना ममता बॅनर्जींनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. कोलकात्यात झालेला बॉम्बस्फोट ही अत्यंत चिंतेची बाब आहे. याची एनआयएमार्फत चौकशी झाली पाहिजे. पोलीस या स्फोटाचा योग्य दिशेने तपास करू शकत नाहीत असे सांगतानाच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस अवघड होत चालल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. सुकांत मजुमदार यांनी गृह मंत्रालयाला पत्र लिहून एनआयए तपासाची मागणीही केली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच तलतला पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसराला नाकाबंदी करण्यात आली होती. बॉम्ब शोधक पथकाला (बीडीडीएस) तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बीडीडीएस अधिकाऱ्यांनी कचरावेचक महिलेकडील बॅग आणि आजूबाजूच्या परिसराची बारकाईने तपासणी करत परिसरात आणखी स्फोटके नसल्याची खात्री केली. तपासानंतर पथकाने परिसर धोक्मयाबाहेर असल्याचे जाहीर केले.

Advertisement
Tags :

.