For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॉलिवूडकरांची सुरक्षा रामभरोसे !

06:49 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
बॉलिवूडकरांची सुरक्षा रामभरोसे
Advertisement

एके काळी अंडरवर्ल्ड आणि बॉलिवुड यांचे समिकरण होते. अंडरवर्ल्डने साम-दाम-दंड-भेद नितीचा अवलंब करायचा आणि बॉलिवूडने अगदी तंतोतंत ते पाळायचे. त्यातून कोणी डोके वर काढायचा प्रयत्न केलाच, तर त्याचा अंडरवर्ल्डकडून ’पोटला’ (हत्या) झालाच म्हणून समजायचा. त्यातच बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान याना जीवे मारण्याची धमकीचे प्रकरण ताजे असतानाच बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानवर झालेला जीवघेणा हल्ला म्हणजे बॉलिवूडकरांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे आढळून येते.

Advertisement

बॉलिवूड जगतात नवाब अशी ओळख असलेल्या सैफ अली खानवर त्याच्याच घरात जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्यातून नशिब बलवत्तर म्हणून सैफ अली खान वाचला. हल्ला करणारा देखील मजबूत असा मुरलेला कुस्तीपट्टू आरोपी होता. त्यातच तो चाकु चालविण्यात देखील निष्णात असल्याने, हा हल्ला नेमका चोरीच्या उद्देशाने झाला की यामागे आणखी काय कारण आहे याचा तपास सुऊ आहे. भलेही प्राथमिक तपासात हा चोरीचा जरी उद्देश असल्याचे समोर येत असले तरी त्याच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. कारण बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता या ठिकाणी भारतवासियांना त्यातल्या त्यात हिंदुना टार्गेट केले जात आहे. तसेच बांगलादेशच्या उचापती देशात देखील वाढल्याची माहिती गुप्तचर यंत्रणाना लागली आहे. यामुळे त्यांनी देशातील सर्व राज्य पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे देशात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात स्थानिक पोलिसांनी जोरादर मोहीम उघडली आहे. एकीकडे अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुऊवात केली असतानाच दुसरीकडे वान्दे येथे राहणारा बॉलिवूड जगतातील नवाब सैफ अली खानवर बांगलादेशी नागरिक असलेल्या आरोपीने जीवघेणा हल्ला केला. सलमान खान, सैफ अली खान यांच्यावर हल्ले तर शाहऊख खान याच्या घराची रेकी हे सर्व पाहता बॉलिवूडकरांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.

देशातच नव्हे तर जागतील अनेक देशात नावजलेल्या अभिनेत्याची घरात हा आरोपी घुसतोच कसा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामागे घरातीलच घरभेदी तर नाही ना? असा प्रश्न पडणे साहजीकच आहे. कारण घराच्या गेटमधून तो बिनदिक्कत आतमध्ये येतो. त्यानंतर तो सैफ अली खानच्या मुलाच्या बेडऊमपर्यंत घुसतो. नंतर येथे काम करणाऱ्या महिलेवर हल्ला करतो. त्यानंतर या महिलेला वाचविण्यासाठी सैफ या आरोपीवर तुटुन पडतो. यामध्ये तो गंभीर जखमी होतो तर आरोपी पळून जाण्यात यशस्वी होतो. हे सर्व ऐकल्यानंतर एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट अथवा सीन असल्यासारखे वाटते. मात्र हे वास्तव आहे. वास्तविक आयुष्यात देखील आपण एक हिरो आहोत हे सैफ अली खानने दाखवून दिले. ते सर्व ठिक आहे, मात्र प्रश्न आहे तो सुरक्षेचा. एवढे सर्व झाल्यानंतर हा आरोपी आपले कपडे बदलून तो वरळी परिसरात येतो. या ठिकाणी दादर येथून हेडफोन खरेदी करतो आणि पेमेंट करताना जीपेचा वापर करतो आणि येथेच तो सापडतो. बांगलादेशात राष्ट्रीय स्तरावर कुस्तीपट्टु असलेला हा आरोपी केवळ चोरीच्या उद्देशाने घरात घुसला की यामागे नेमके काय आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेमुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा हल्ला म्हणजे भविष्यात मोठ्या संकटाची चाहुल असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण यापूर्वी देखील बॉलिवुडला टार्गेट केले आहे.

Advertisement

पंजाबसह जगातील अनेक देशांत आपल्या

रॅपर पंजाबी गाण्याने भुरळ पाडणाऱ्या सुभाषसिंग बलकौरसिंग उर्फ सिद्धु मुसेवाला याची भरदिवसा अत्याधुनिक शस्त्राने गोळ्या झाडून हत्या केली होती. सिद्धु मुसेवाला हा केवळ गायक नसून, तो राजकारणी देखील होते. पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर उभे होते. मात्र आपच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. या हल्याची जबाबदारी तिहार कारागृहात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई आणि

कॅनडामध्ये स्थायीक असलेल्या गोल्डी ब्रार यांनी घेतली होती. सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर

बॉलिवूडमध्ये दबंग अभिनेता अशी ओळख असलेल्या सलमान खान आणि त्याचे वडील सलाम खान याना ज़ीवे मारण्याची धमकी आली. एवढेच नाही तर भर दिवसा सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. यामुळे

बॉलिवूडमध्ये पुन्हा धमकीसत्र आणि गँगवॉर सुऊ झाला की काय? अशी शंका मुंबई पोलिसांना आली होती. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान याना धमकी देण्याची आणि गोळीबार करण्याची जबाबदारी देखील लॉरेन्स बिश्नोई याने घेतली होती. बॉलिवूडमध्ये अनेकदा गँगवॉर, हत्यासत्र, धमकी, खंडणी तसेच ब्लॅक मनी गुंतविल्याचे प्रकार समोर आले आहेत. मुंबईत अंडरवर्ल्ड चरणसीमावर असताना दाऊदने दुबईत बस्तान बसविले होते. दुबईत राहून तो मुंबईवर राज करीत होता. त्याची एवढी दहशत होती की, बॉलिवूडसुद्धा त्याच्या इशाऱ्यावर उघडपणे नाचत होते. 1992 च्या पूर्वी अनेक अभिनेते देखील दाऊदचा पाहुणचार घेण्यासाठी दुबईत जात होते. दाउदला कोणतीही अभीनेत्री आवडली तर तो तीला तत्काळ दुबईला बोलावून घेत असे. यामध्ये मंदाकिनी या अभिनेत्रीचे नाव अनेकदा चर्चेत होते.

या सर्वांचे व्हिडीओ तसेच फोटो आजही क्राईम ब्रँचकडे आहेत. मिथून चक्रवर्ती, संजय दत्त, फिरोज खान, जॉनी लिवर, आदित्य पंचोली, अनिता अयुब, अनिल कपुर, असरानी, मजहर खान हे सर्व अभिनेते 1992 पूर्वी दाऊदच्या खुप जवळ होते. एखाद्या अभिनेत्याला किवा अभिनेत्रीला चित्रपटात काम द्यायचे असेल तर दाउदच्या एका फोनवर त्याना काम मिळत होते. एवढी दहशत दाऊदची त्याकाळी होती. जर दाऊदचे कोणी ऐकले नाही तर येणाऱ्या काही दिवसातच त्याचा ’पोटला’ (हत्या) केला जायचा. यामुळे दाऊदला कोणी नाही म्हणण्याची हिमंत करीत नसे.  त्याचप्रमाणे, गँगस्टर अबु सालेमने देखील बॉलिवूडमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. तर गुलशन कुमारमुळे आपले अस्तित्व धोक्यात आहे, याची जाणीव झालेल्या नदीम याने अबु सालमेला गुलशन कुमार हत्येची सुपारी ]िदली. त्यानुसार, अबु सालेमने 12 ऑगस्ट 1997 साली अंधेरी येथील चार बंगला परिसरात असणाऱ्या शिवमंदिरासमोर गुलशन कुमार यांची  हत्या केली होती. या हत्येमुळे संपूर्ण बॉलिवूड जगत हादऊन गेले होते. तसेच छोटा शकिलने आर्थिक व्यवहारावऊन चित्रपट निर्माते मुकेश दुग्गल यांची हत्या केली होती.

सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या रवि पुजारीने देखील बॉलिवूड क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली होती. चित्रपट निर्माते महेश भट्ट याना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही तर महेश भट्ट यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या तब्बल 13 जणांना राकेश मारीया पोलीस आयुक्त असताना अटक करण्यात आली होती. वास्तविक पाहता, अशी अनेक उदाहरणे अथवा घटना आहेत, ज्यामध्ये बॉलिवूड अनेकदा अंडरवर्ल्डचे बळी पडले आहे. अगदी त्याचप्रमाणे, आताही तेच घडतेय की काय? अशी शंका येण्यास सुऊवात झाली आहे. कारण सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याची जबाबदारी भलेही लॉरेन्स बिश्नोई याने घेतली असेल, मात्र सध्या तो तिहार कारागृहात आहे. मात्र येथे तर सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला केल्याने, बॉलिवूडची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.

- अमोल राऊत

Advertisement
Tags :

.