बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचं लव्हलाईफ पुन्हा चर्चेत
मुंबई
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत आहेत. क्रिती बिझनेसमन कबीर बहियासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. तर येत्या वर्षात हे दोघे लग्नाबंधनात अडकणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. यादरम्यान क्रिती आणि कबीर हे दोघे एकत्र ख्रिसमस साजरा करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधीही दुबईत एका लग्नासोहळ्यात क्रिती, कबीर आणि त्याच्या कुटुबिंयासोबत सामील होऊन आनंद लुटताना दिसत होती. हा व्हिडीओपण खूप व्हायरल झाला होता.
अलिकडेच राहत फतेह अली खान च्या कॉन्सर्टमध्ये क्रिती सेनॉन आणि कबीर बहीया एकत्र दिसले होते. यावेळी क्रितीचा बहीण नुपूर सेनॉन आणि साक्षी व एम एस धोनी ही एकत्र दिसले होते. या कार्यक्रमातील काही फोटो क्रितीची बहीण नुपूरने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या कार्यक्रमादरम्यान दोघांची छान केमिस्ट्री दिसून आली.