विक्रांत मेस्सीची बॉलीवूड मधून रिटायरमेंट
मुंबई
बालिकावधू मधून घराघरात ओळख निर्माण करणारा आणि आता यशाच्या शिखरावर मार्गक्रमण करणारा बॉलावूड अभिनेता विक्रांत मेस्सी याने सोशल मिडीयावरून अचानक त्याची निवृत्ती जाहीर केली.
बालिका वधू च्या आधी धूम मचाओ धूम या वेब सिरीजमधून त्याने पदार्पण केले. आणि १२ फेल च्या यशानंतर तर त्याच्या अभिनयाच्या गाडीला यशाचा वेग मिळाला होता. अशातच त्याने अचानक हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्याचे फॅन्स नाराज झालेच आहेत तर सोशल मिडीयावरही याची खूप चर्चा होत आहे.
विक्रांतची पोस्ट
घरी परत जाण्याची वेळ आली. गेली काही वर्ष या क्षेत्रात अभूतपूर्व होती. आजवर मला तुम्ही जे प्रेम दिलं त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. पण आता एक नवरा म्हणून, एक वडील म्हणून आणि एक मुलगा म्हणून माझी घरी परत जाण्याची वेळ आली. येत्या नववर्षात आपण माझ्या येऊ घातलेल्या २ नवीन सिनेमांद्वारे शेवटचे भेटू. धन्यवाद
या आशयाची इन्स्टा पोस्ट शेअर करून विक्रांतने निवृत्तीची घोषणा केली. आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली.
त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'द साबरमती रिपोर्ट' हा सिनेमा जोरदार सुरू आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान विक्रांतने त्याच्या मुलाप्रती एक भीती व्यक्त केली होती. त्याला व्हॉट्सअॅपवर धमक्यांचे मेसेज येत आहेत. या धमक्यांमध्ये त्याच्या ९ महिन्यांच्या मुलालाही लक्ष केले जाता आहे. ही चिंतेची बाब आहे. आपण कोणत्या समाजात राहतो ? माफ करा. घाबरू नका. तसं वाटत असतं तर हा सिनेमा बनला नसता. असे ही मत त्याने व्यक्त केले होते.