For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भावनगरमध्ये ट्रकला बोलेरोची धडक, शिपयार्डच्या 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

06:39 AM Oct 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
भावनगरमध्ये ट्रकला बोलेरोची धडक  शिपयार्डच्या 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू
Advertisement

भावनगर: गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे एक भीषण दुर्घटना घडली. भावनगरनजीक त्रापज येथे एका भरधाव बोलेरोने ट्रकला मागून धडक दिली. या दुर्घटनेत बोलेरोतील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Advertisement

दुर्घटनाग्रस्त बोलेरोमधून अलंग शिपब्रेकिंग यार्डचे कर्मचारी प्रवास करत होते. या भीषण दुर्घटनेचे वृत्त कळताच अलंग शिपयार्ड आणि मृतांच्या परिवारांमध्ये शोक पसरला आहे. दुर्घटनेत जयेशभाई हे गंभीर जखमी झाले असून त्यांना भावनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत मदत अन् बचावकार्य सुरू केले होते. पोलिसांनी सर्व 6 मृतदेह ताब्यात घेत ते उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत. तर दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास हाती घेण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.