उकळत्या पाण्याची नदी
चुकून पात्रात पडल्यास मृत्यूची 100 टक्के गॅरंटी
पेरू या देशातील मयंतुयाकूमध्ये एक तप्त पाणी असणारी नदी आहे. या नदीत चुकून कुणी पडले तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. स्थानिक लोक या नदीला ‘शनय-टिम्पिका’ म्हणतात, याचा अर्थ ‘सूर्याच्या उष्णतेमुळे उकळणारे’ असा होतो. अखेर या नदीतील पाणी उकळते का असते, हा प्रश्न उपस्थित होतो. नदीत हे उकळते पाणी यकुमामा नावाची एक विशाल नागिण सोडत असल्याची स्थानिक लोकांची मान्यता आहे. या नागिणीला हे लोक ‘जलदेवता’ म्हणतात. नदीच्या हेडवॉटरला सापाच्या शिराच्या आकारातील एका बोल्डरद्वारे दर्शविण्यात आले आहे. येथे बोल्डरचा अर्थ मोठ्या दगडांच्या तुकडे असा असू शकतो.
ही नदी जवळपास 25 मीटर रुंद आणि 6 मीटर खोल आहे, परंतु केवळ 6.4 किलोमीटर लांब आहे, यातील पाण्याचे तापमान 50 ते 90 अंश सेल्सिअसदरम्यान असते. परंतु कधीकधी हे पाणी 100 अंश सेल्सिअसपर्यंत तप्त असू शकते. नदीच्या आसपासचे ठिकाण प्राण्यांसाठी धोकादायक आहे, कारण अनेक प्राणी या नदीत पडून मृत्युमुखी पडत असतात. शनय-टिम्पिका नदी नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे. याच्या उकळत्या पाण्यावरून जियोलॉजिस्ट्सने संशोधन केले आहे. नदीतील पाणी अशाप्रकारे उकळण्यासाठी मोठ्या प्रमाणात भूतापीय उष्णतेची आवश्यकता असते आणि अमेझॉन खोऱ्याच्या सर्वात नजीक असलेल्या ज्वालामुखीपासून ही नदी 400 मैल अंतरावर आहे. सक्रीय ज्वालामुखीसारख्या शक्तिशाली ताप स्रोताशिवाय नदी इतकी तप्त किंवा तीव्रतेने उकळू शकत नाही. साउथ मेथोडिस्ट युनिव्हर्सिटीचे जियो-थर्मल सायंटिस्ट एन्ड्रेस रुजो यांनी या नदीवरून ‘द बॉयलिंग रिव्हर : अॅडव्हेंचर अँड डिस्कव्हरी इन द अमेझॉन’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. तसेच ते या उकळत्या नदीवर विस्तृतपणे जिओ-थर्मल अध्ययन देखील करत आहेत.