महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मराठा युवक संघाच्या शरिरसौष्ठव स्पर्धेला प्रारंभ

10:08 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : मराठा युवक संघ आयोजित कर्नाटक क्रीडा प्राधिकरणच्या मान्यता प्राप्त 58 वी बेळगाव श्री जिल्हास्तरीय व बेळगाव हॅर्क्युलस आंतरराज्य शरिरसोष्ठव स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या. 150 मराठा मंदिरच्या सभागृहात  आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन उद्योजक सचिन उसुलकर, मि. इंडिया प्रितम चौगुले, बाळासाहेब काकतकर, संजय मोरे, दिंगबंर पवार, नेताजी जाधव, चंद्रकांत गुंडकल, रघुनाथ बांडगी, मारूती देवगेकर, दिनकर घोरपडे, शिवाजी हंगिरगेकर, रमेश पावले, सुनिल भोसले, नारायण किटवाडकर, अजित सिद्दण्णवर, जे.डी. भट आदी मान्यवर उपस्थित होते. प्रितम चोगुले व सचिन उसुलकर यांच्या हस्ते दीपप्रवलन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सदर स्पर्धा आईबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार बेळगाव हॅक्युलर्स ही स्पर्धा कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील शरीराष्ट्रपटूंना मर्यादित असून 60 किलो, 70 किलो, 80 किलो व 80 वरील वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. पहिल्या पाच विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे दहा हजार रुपये, 6000 रुपये, चार हजार रुपये, तीन हजार रुपये, व दोन हजार रुपये रोख पदके प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. तर बेळगाव हॅर्क्युलर्स त्या मानाच्या किताब किताब विजेत्या स्पर्धकाला 21 हजार रुपये रोख, मानाचा किताब आकर्षक चषक, प्रमाणपत्र तर पहिल्या उपविजेत्या या स्पर्धकाला 15 हजार रुपये रोख, चषक, प्रमाणपत्र, व दुसऱ्या उपविजेत्या स्पर्धकाला 11 हजार रुपये रोख, चषक प्रमाणपत्र देऊन  गौरविण्यात येणार आहे,58 व्या बेळगाव श्री जिल्हास्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धा खालील वजनी गटात घेण्यात येणार आहे 55 किलो,60, 65, 70, 75, 80 व 80 वरील गटात घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्या पहिल्या पाच स्पर्धकाना अनुक्रमे पाच हजार रुपये, चार हजार रुपये, तीन हजार रुपये, दोन हजार रुपये व एक हजार रुपये रोख पदके प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article