बेळगावचा शरीरसौष्ठवपटू कोल्हापुरात घेतोय व्यायामाचे धडे
कोल्हापूर / संग्राम काटकर :
त्यांचे नाव प्रशांत यल्लाप्पा खन्नूकर. एक दर्जेदार शरीरसौष्ठवपटू. बारा वर्षांपूर्वी त्यांनी मिस्टर इंडिया तथा भारत-श्री शरीर सौष्ठवपटू स्पर्धेत 75 किलो वजन गटात रौप्य पदक मिळवले आणि आपले नाव कर्नाटकच्या पटलावर झळकवले. अखंड सोळा वर्षे केलेल्या व्यायामाचे हे फळ आहे. त्यांचे आता लक्ष आहे मिस्टर एशिया आणि मिस्टर युनिव्हर्स या जागतिक स्पर्धेत उतरुन भारत देशाला पदक मिळवून देणे.
आधुनिक वर्कआऊट, आकर्षक पोझिंगचा सराव करण्यासाठी प्रशांत गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूरात आले आहेत. साडी निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात जन्मलेले प्रशांत खन्नूकर हे मूळचे बेळगावचे. सोळा वर्षांपूर्वी शिक्षण घेत असताना ते बेळगावात होणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धां व शरीरसौष्ठवपटूंना पाहण्यास जात होते. शरीरसौष्ठवपटूची मस्क्युलर बॉडीपासून प्रशांत व्यायामाकडे वळले. बेळगाव महापालिकेच्या व्यायामशाळेत घाम गाळू लागले. त्यांना कर्नाटक बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सचिव अजित सिद्धनवर, मिस्टर इंडियाचे मानकरी सुनील आपटेकर, बेळगाव श्री विजेता प्रसाद जाधव यांचे मार्गदर्शन मिळत राहिले.
एक वर्षभरातील व्यायायामुळे प्रशांत यांच्या शरीराने मस्कुलरचा आकार घेतला. शरीरसौष्ठव स्पर्धेत पोझिंग करण्यालायक शरीराला कटस् पडले. बेळगावमध्ये झालेल्या गणेशश्री शरीरसौष्ठव स्पर्धेत 55 किलो वजन गटातून प्रथमच उतऊन प्रशांत यांनी बहारदार पोझिंग करून पहिला क्रमांकही पटकावला. या यशाने प्रशांत यांचा हुऊप वाढला. त्यांनी बायसेप, ट्रायसेप, विंग्स, थाईज, शोल्डर, मस्कूलर बॅक, अॅबडॅमिनल मसल, काप्स, हॅमस्टिंग हे शरीराचे भाग व्यायामाच्या जोरावर विकसित केले.
राज्यस्तरीय बेळगाव श्री, कर्नाटक श्री, सतीश शुगर क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेत 80 किलो वजन गटातून सहभागी होत दर्जेदार शरीरसौष्ठवपटूंना टक्कर देत प्रथम क्रमांकही मिळवला. या कामगिरीमुळे प्रशांत यांचे कर्नाटकात नाव झाले.
- राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व
2012 साली प्रशांत यांनी राज्यबरोबरच राष्ट्रीय स्पर्धेतही उतरण्याचे पक्के करून जिममध्ये हेवी व्यायामाला सुरु केला. सकाळी दोन आणि सायंकाळी दोन तास असा व्यायाम, महागडा खुराक आणि 10 तास विश्रांती असे प्रशांत यांनी वेळापत्रक ठरवले. वेळापत्रकानूसार व्यायाम करत शरीराच्या भागांची मेजरमेंट वाढवली. त्याच्या जोरावर 2012 साली बेळगाव येथे राष्ट्रीयस्तरावर झालेल्या सतिश शुगर क्लासिक्स शरीरसौष्ठव स्पर्धेत 75 किलो वजन गटातून प्रशांत यांनी प्रतिनिधित्व केले. पिळदार शरीराच्या भागांचे पोझिंग करत रौप्य पदकही मिळवले. जिल्हास्तरीय सतीश शुगर क्लासिक्स स्पर्धेतही चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताब मिळवताना 1 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले.
- 2022 साली कोल्हापूरात प्रशांत यांचे आगमन
शुगर 2016 व 17 सालीही झालेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतही 80 किलो वजन गटातही चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताब जिंकला. या जोमदार 2017 साली प्रशांत यांनी राज्यस्तरीय कर्नाटक श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत 80 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे प्रशांत यांची गुडगाव (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या भारत-श्री शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी कर्नाटक बॉडी बिल्डिंग असोसिएशनने निवड केली. या स्पर्धेत 75 किलो वजन गटातून उतरून कांस्यपदकही पटकावले. नोकरीच्यानिमित्ताने प्रशांत 2022 साली कोल्हापूर झाले. टेंबलाईवाडी येथे स्थायिक झाले. कोल्हापुरात शाहूपुरीतील व्ही-पॉवर फिटनेस जिममध्ये घाम गाळायला सुरुवात केली. जिमचे मालक, भारत-श्री किताब व शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय मोरे यांच्याकडून मार्गदर्शन मिळत राहिले.
- दक्षिण कोरियातील मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सहभाग
2023 साली झालेल्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेतील 80 किलो वजन गटात विजेतेपद मिळवत भारतीय संघ निवड चाचणीतही स्थान मिळवले. गोवा येथे इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनने आयोजित भारतीय संघ निवड चाचणीत 80 किलो वजन गटातून उतरून आकर्षक पोझिंग कऊन भारतीय संघात स्थानही मिळवले. या संघातून दक्षिण कोरियात झालेल्या मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनमध्ये प्रतिनिधित्व केले, परंतु अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. 2024 साली बेळगावात झालेल्या अन्नोत्सव स्पर्धेत 80 किलो वजन आणि जानेवारी 2025 मध्ये बेळगावात झालेल्या भारत-श्री शरीर सौष्ठवपटू स्पर्धेतही 75 किलो वजन गटात कांस्य पदक मिळवले.
- प्रशांत यांचा रोजचा खुराक असा
-20 अंडी, एक किलो चिकन, ड्रायफ्रुटस्, फळे, सप्लीमेंटस् प्रोटीन.
-खुराकासाठी रोज एक हजारहून अधिक रुपये खर्च करावा लागतो.
मिस्टर एशिया आणि मिस्टर युनिव्हर्स या जागतिक स्पर्धेत सहभागी होणे हे माझे लक्ष्य आहे. या दोन्ही जागतिक स्पर्धेत उतरायचे म्हटले तर त्याच तोडीचा व्यायाम करावा लागतो. त्यानुसारच गेल्या दीड वर्षांपासून रोज सकाळी तीन आणि सायंकाळी तीन तास व्यायाम सुरू ठेवला आहे. तसेच मिस्टर एशिया आणि मिस्टर युनिव्हर्स या स्पर्धांसाठी जागतिक दर्जाच्या पोझिंग मारण्याचाही सराव करत आहे.
-प्रशांत खन्नूकर (आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू)