For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणकवलीत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह

02:08 PM Mar 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कणकवलीत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह
Advertisement

कणकवली / प्रतिनिधी
शहरातील महापुरुष काॅम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूला असलेल्या इमारतीलगत टेकून बसलेल्या स्थितीत कुजलेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. इमारतीजवळ दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी पाहिले असता सदरचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांनी दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, सागर शेगडे, पांडुरंग पांढरे, भूषण सुतार दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनाकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी त्या युवकाचा मृत्यू झाला असावा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.