बेपत्ता मच्छीमाराचा मृतदेह दांडी किनाऱ्यावर आढळला
02:55 PM Jul 09, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
मालवण | प्रतिनिधी
Advertisement
मेढा येथील समुद्रात मासेमारी नौका पलटी होऊन समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या जितेश वाघ (३५ ) या मच्छिमाराचा मृतदेह बुधवारी दुपारी दांडी किनाऱ्यावर दिसून आला आहे. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून ते घटनास्थळी दाखल झाले. मेढा समोरील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका वारा आणि लाटांच्या तडाख्यात पलटी झाली. यात तीन मच्छिमार समुद्रात पडले. दोघेजण वाचले तर जितेश वाघ हा बेपत्ता झाला होता. काल दिवसभर त्याचा शोध घेण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात राहून शोध व बचाव कार्याचा आढावा घेत होते. दरम्यान, बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान दांडी किनारी जितेश वाघ यांचा मृतदेह स्थानिक मच्छिमारांना आढळून आला.
Advertisement
Advertisement
Next Article