For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

बोडगेश्वर मंदिर समितीला उच्च न्यायालयाचा दणका; तीन महिन्यांत पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती

10:50 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
बोडगेश्वर मंदिर समितीला उच्च न्यायालयाचा दणका  तीन महिन्यांत पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश  प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती
Advertisement

पणजी: म्हापसा येथील प्रसिद्ध श्री देव बोडगेश्वर मंदिर समितीच्या निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देताना विद्यमान मंदिर समितीला धक्का दिला आहे. मंदिर समितीची पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून, ही प्रक्रिया ३ महिन्यांच्या आत पूर्ण करण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

Advertisement

या प्रकरणी मंदिराच्या निवडणूक प्रक्रियेला आनंद भाईडकर आणि संतोष वागर या सदस्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. देवस्थानचे नवनिर्वाचित समितीचे अध्यक्ष अॅड. वामन पंडित, उपाध्यक्ष अमेय कोरगावकर, सचिव हरिश्चंद्र गावकर, सहसचिव कुणाल धारगळकर, खजिनदार श्यामसुंदर पेडणेकर, उपखजिनदार विशांत केणी, मुखत्यार राजेंद्र पेडणेकर व उपमुखत्यार साईनाथ राऊळ तसेच बार्देशातील देवालयांच्या प्रशासकांना प्रतिवादी बनविले होते.

गेल्या ९ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री देव बोडगेश्वर देवस्थानची निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या ऐन वेळी म्हणजेच शुक्रवार ७ रोजी सायंकाळी देवालय प्रशासकांनी देवस्थानच्या सचिवांनी सादर केलेली नव्या २५४ महाजनांसह एकूण २१०४ जणांची यादी मतदानासाठी ग्राह्य धरून त्यांना मतदानात सहभाग घेण्यास मोकळीक देणारा आदेश जारी केला होता. त्यानंतर याच यादीनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत याचिकादार आनंद भाईडकर हे पराभूत झाले होते. या निवडणूक प्रक्रियेविरुद्ध देवस्थानतर्फे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी उच्च न्यायालय तसेच प्रशासकीय बार्देशातील देवालयांच्या प्रशासकांना प्रतिवादी बनविले होते.

Advertisement

गेल्या ९ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री देव बोडगेश्वर देवस्थानची निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या ऐन वेळी म्हणजेच शुक्रवार ७ रोजी सायंकाळी देवालय प्रशासकांनी देवस्थानच्या सचिवांनी सादर केलेली नव्या २५४ महाजनांसह एकूण २१०४ जणांची यादी मतदानासाठी ग्राह्य धरून त्यांना मतदानात सहभाग घेण्यास मोकळीक देणारा आदेश जारी केला होता. त्यानंतर याच यादीनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत याचिकादार आनंद भाईडकर हे पराभूत झाले होते. या निवडणूक प्रक्रियेविरुद्ध देवस्थानतर्फे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी उच्च न्यायालय तसेच प्रशासकीय लवादाकडे याचिका दाखल केली होती.

बोडगेश्वर देवस्थानच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात माजी अध्यक्ष आनंद भाईडकर आणि महाजन संतोष वागर यांची याचिका यापूर्वी प्रशासकीय लवादाचे अध्यक्ष द्विजपल पाटकर यांनी फेटाळून लावली होती. या याचिकेवरील निवाडा ६० दिवसांत द्यावा, तसेच निवाड्याचा अंतरिम अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च रोजी गोवा प्रशासकीय लवादाला दिले होते. त्यानुसार ३० मे रोजी लवादाने वरील दोन्ही याचिका रद्दबातल ठरवल्या होत्या. त्यानंतर आनंद भाईडकर व संतोष वागर यांनी या निर्णयाला वरील न्यायालयात आव्हान दिले होते.

सध्याच्या प्रकरणात, अध्यक्ष किंवा कोषाध्यक्ष ही पदे वगळता, निवडून आलेले उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यातील मतांचे अंतर २५४ मतांपेक्षा कमी आहे. त्यामुळे, २५४ सदस्यांच्या समावेशामुळे निवडणुकीवर परिणाम झाला असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला. न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे की, ५९ सदस्यांनी २५४ नवीन सदस्यांच्या समावेशाबाबत समितीच्या अध्यक्षांकडे आक्षेप नोंदवले होते. २७ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत विचारासाठी ठेवले होते, परंतु त्यावर विचार करणे १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पुढे ढकलले; त्यानंतर मात्र कोणतीही बैठक आयोजित केली नाही. न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की, निवडणुकीच्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग असलेल्या नियमांमधील अनिवार्य तरतुदींचे उल्लंघन करून तयार केलेल्या मतदारयादीच्या आधारे निवडणूक घेणे आणि त्याचे निकाल जाहीर केल्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया दूषित झाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालावर त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे.

Advertisement
Tags :

.