बॉबी पारीख यांची एचयुएलच्या संचालकपदी निवड
1 डिसेंबरपासून होणार कार्यरत : 5 वर्षासाठी नियुक्ती
नवी दिल्ली : एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी बॉबी पारीख यांची निवड करण्यात आली आहे. कंपनीने यासंबंधीची माहिती शेअरबाजाराला दिली आहे. बॉबी पारीख हे अर्न्स्ट अँड यंग इंडियाचे माजी सीईओ आहेत. बॉबी पारीख हे एचयुएलच्या स्वतंत्र संचालपदाचा कार्यभार 1 डिसेंबर 2025 पासून सांभाळणार आहेत. सदरची बॉबी पारीख यांची नियुक्ती पुढील 5 वर्षासाठी असणार आहे. त्यांच्या नियुक्तीला आता समभागधारकांची मंजुरी मिळणे बाकी आहे. पारीख यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. धोरणात्मक सल्लागार म्हणून त्यांनी इन्फोसिस, बायोकॉन व इंडोस्टार कॅपिटल यांच्यासाठी काम केले आहे. जवळपास दशकभराचा कामाचा अनुभव त्यांना आहे. कंपनीचे बिगरकार्यकारी चेअरमन नितीन परांजपे म्हणाले, आम्ही बॉबी यांना संचालक मंडळात घेतल्याबद्दल आनंदी आहोत. त्यांच्या कामाच्या अनुभवाचा फायदा कंपनीला नक्कीच होईल यात शंका नाही. व्यवसाय बदलासाठी त्यांच्याकडून भविष्यात मोलाचे मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे.