‘बंदर’मध्ये बॉबी देओल अन् सान्या
अनुराग कश्यपकडून दिग्दर्शन
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपचा नवा चित्रपट ‘बंदर’/ मंकी इन अ केजचा वर्ल्ड प्रीमियर 50 व्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती निखिल द्विवेदीने केली असून यात बॉबी देओल आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
निर्मात्यांनी चित्रपटातील बॉबीचा इंटेंस लुक सादर केला आहे. एक कहाणी जी बहुधा कधीच सांगितली जायला नको होती, परंतु आता 50 व्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविली जाणार आहे. आमचा चित्रपट सत्य घटनांनी प्रेरित आहे असे निर्मात्यांनी कॅप्शनदाखल म्हटले आहे. बंदर हा चित्रपटात बॉबी हा मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत सान्या मल्होत्रा, सबा आझाद आणि सपना पब्बी देखील दिसून येणार आहे. निर्माता निखिल द्विवेदीने यापूर्वी ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘सीटीआरएल’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आताही तो वेगवेगळ्या कहाण्यांना मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी प्रयत्नशील आहे. निखिल लवकरच श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘नागिन’ची निर्मिती करणार आहे.