कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘बोट’ने उत्पादनात केली वाढ

06:24 AM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

इयर बडस्, इयरफोन, हेडफोनसह इतर उत्पादने निर्मिती करणाऱ्या बोटने भारतातच उत्पादनांच्या निर्मितीवर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती मिळते आहे. ही कंपनी आता भारतातील ग्राहकांची लोकप्रिय कंपनी ठरली आहे. 30 जून 2025 पर्यंत कंपनीने 75 दशलक्ष इतक्या उत्पादनांच्या निर्मितीचा यशस्वी टप्पा पार केला आहे.

Advertisement

एकूण उत्पादनामध्ये पाहता 75 टक्के इतका वाटा भारतातच तयार करण्यात आलेल्या उत्पादनाचा आहे. 2026 च्या पहिल्या तिमाहीत 75 टक्के इतकी उत्पादन क्षमता प्राप्त करण्यात आली आहे, जो उत्पादनातील वाटा आर्थिक वर्ष 2023 मध्ये 39.65 टक्के इतका होता. डिक्सन टेक्नॉलॉजी-कॅलीफोनिक्स टेक यांच्या सहाय्याने कंपनी उत्पादनांची निर्मिती करत असून विक्रीचे जाळेही चांगले मजबूत करण्याचा प्रयत्न करते आहे. 30 जून 2025 ला संपलेल्या तीन महिन्यांमध्ये बोट कंपनीने 6.36 दशलक्ष उत्पादनांची निर्मिती केली आहे. याआधीच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 4.42 दशलक्ष उत्पादनांची निर्मिती केली. मेक इन इंडिया अंतर्गत कंपनी भारतातच उत्पादन निर्मितीवर भर देत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article