बोट कंपनीचा लवकरच येणार आयपीओ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी बोट आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आपला आयपीओ म्हणजेच प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव दाखल करणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 2 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याची माहिती उपलब्ध आहे.
कंपनी 12 हजार 998 कोटी रुपयांच्या मूल्यावर आयपीओ आणणार आहे. यापूर्वी 2022 मध्ये कंपनीने आयपीओ आणण्यासाठी अर्ज केला होता. परंतु बाजारातील अस्थिर परिस्थिती पाहून कंपनीने आपला अर्ज मागे घेतला होता. कंपनीने बाजारात सूचीबद्ध होण्याऐवजी 520 कोटी रुपये खासगी गुंतवणुकीतून उभे करण्याचा विचार केला होता. 2024 मध्ये कंपनीची वेरेबल बाजारामध्ये 26 टक्के हिस्सेदारी आहे.
कधी झाली स्थापना
2013 मध्ये या कंपनीची स्थापना झाली असून आज भारतामधील आघाडीवरची वेरेबल आणि ऑडिओ डिव्हाईस निर्माती कंपनी बनली आहे. 2024 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत कंपनीकडे देशातील वेरेबल बाजारात 26 टक्के इतका वाटा होता.