For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारमध्ये 21 मजुरांसह बोट उलटली

06:22 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिहारमध्ये 21 मजुरांसह बोट उलटली
Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

Advertisement

बिहारमधील भागलपूर येथे 21 मजुरांना घेऊन जाणारी एक बोट बुधवारी उलटली. हे मजूर गंगा नदीच्या काठावर वाळूच्या पिशव्या टाकत होते. याचदरम्यान अचानक एक बाजू खूप जड झाल्यामुळे बोट उलटून गंगेत बुडाली. बोट कलंडताच सर्व मजूर नदीत पडले. बचाव पथकांनी 20 मजुरांना सुखरूप बाहेर काढले आहे. एक मजूर अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. राज्यात मुसळधार पावसाचे सत्र सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आहे. बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या मान्सूनच्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. चंदौलीमधील मुसाखंड आणि लतीफशाह धरणे ओसंडून वाहत असल्याने त्यांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. लखीमपूरमधील शारदा नदीवरील तमोलिन पुरवा धरणाचा एक भाग फुटला आहे. दरम्यान, महोबा येथील जिल्हा रुग्णालयात पाणी शिरले असून, आपत्कालीन कक्षाच्या छतातून पाणी गळू लागले आहे. मध्य प्रदेशच्या पूर्व भागानंतर, आता मान्सून उत्तर, पश्चिम आणि मध्य भागांमध्ये सक्रिय होईल. हवामान विभागाने भोपाळ, उज्जैन, सागर, ग्वाल्हेर आणि चंबळ विभागातील 21 जिह्यांसाठी पुढील दोन दिवसांकरिता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.