महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

श्रीनगरमध्ये नौका दुर्घटना, 6 जणांचा मृत्यू

06:55 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

झेलममध्ये पलटली नौका : 6 जणांना वाचविण्यास यश : 3 बेपत्ता

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथे मंगळवारी झेलम नदीत एक नौका पलटली आहे. या नौकेतून 15 जण प्रवास करत होते आणि त्यात 7 शालेय विद्यार्थी अणि 7 जणांचा समावेश होता. दुर्घटनेत 2 मुलांसमवेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना वाचविण्यात आले असून 3 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती श्रीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

ही दुर्घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पावसामुळे नदीची पातळी वाढली होती आणि यासंबंधी प्रशासनाने अलर्ट जारी केला होता. परंतु सोमवारी रात्री पाऊस थांबल्यावर नदीची पातळी काही प्रमाणात कमी झाली होती. एसडीआरएफ, पोलीस आणि सैन्याकडून मंगळवारी सकाळपासूनच बचावकार्य केले जात आहे. सध्या बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नौका नदीच्या प्रवाहाच्या मध्यभागी पोहोचल्यावर ही दुर्घटना घडली आहे. नौकेतून प्रवास करणारे लोक यामुळे बुडाले, आम्ही एक मुलगी आणि 2 मुलांना वाचविल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article