For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संचालक मंडळ डीसीसी बँकेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष ठरवतील

11:54 AM Oct 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
संचालक मंडळ डीसीसी बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष ठरवतील
Advertisement

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती

Advertisement

बेळगाव : हुक्केरी विद्युत सहकारी संस्था व बेळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका संपल्या आहेत. डीसीसी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड करण्यासाठी 13 संचालक एकत्र येऊन चर्चा करून निर्णय घेतील. संपूर्ण जिल्हा व राज्यात दौरा करून विकासकामांना प्राधान्य देणार आहे. निवडणुकीदरम्यान रमेश कत्ती यांनी वाल्मिकी समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्याने यापूर्वीच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस विभाग चौकशी करत आहे. वैयक्तिक टिकेबाबत दिवाळी सण झाल्यानंतर निर्णय घेऊ, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

राज्यात आरएसएसवर निर्बंध घातलेले नाहीत. सरकारी जागेवर कोणतेही उपक्रम राबविण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. हे केवळ आरएसएससाठी नाहीतर सर्व संघटनांसाठी आहे. बिहार निवडणुकीसाठी राज्यातील मंत्र्यांकडून पैसे वेळेवर जात असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. भाजप खोटे बोलण्यात आघाडीवर असून त्यांच्या आरोपांना व विधानांना प्राधान्य देण्याची गरज नाही. कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार, हे पक्ष ठरवितो. पक्षाने आम्हाला तिकीट दिल्याने आम्ही निवडणूक लढवत आहोत, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.