For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीएनपी नेत्याची बांगलादेशात हत्या

07:00 AM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
बीएनपी नेत्याची बांगलादेशात हत्या
Advertisement

 निवडणूकपूर्व हिंसाचार सुरूच

Advertisement

वृत्तसंस्था/ढाका

युवा नेते उस्मान हादी यांच्या हत्येपासून बांगलादेशात निवडणूकपूर्व राजकीय हिंसाचार वाढतच आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) स्वयंसेवक शाखेचे नेते अझीझुर रहमान मुसब्बीर यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजधानी ढाका येथे अज्ञात हल्लेखोरांनी मुसब्बीर यांची गोळ्या घालून हत्या केल्याचे पोलीस आणि पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. मुसब्बीर आणि मसूद जवळच्या रस्त्यावरून चालत असताना दोघांनी गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या घटनेनंतर स्थानिक बीएनपी कार्यकर्त्यांसह काही नातेवाईकांनी सोनारगाव चौकात निदर्शने केली.

Advertisement

बांगलादेशात 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हिंसाचार वाढत असून मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उस्मान हादी यांच्या कुटुंबाने युनूस यांच्यावर गंभीर आरोप करत निवडणुका लांबवण्यासाठी हत्या केल्याचा आरोप केला आहे. बीएनपीच्या स्वयंसेवक शाखेचे स्वयंसेवक दलाचे सरचिटणीस मुसब्बीर यांच्यावर रात्री 8:30 वाजता अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने पांथापथ येथील बीआरबी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे तेजगाव झोनचे अतिरिक्त उपायुक्त फजलुल करीम यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.