For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीएमडब्ल्यूची पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार भारतात लाँच

06:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बीएमडब्ल्यूची पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार भारतात लाँच
Advertisement

नवी दिल्ली : बीएमडब्ल्यू या ऑटोमोबाईल क्षेत्रात दिग्गज कंपनीने आपली पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार आय5 सेडान भारतात लाँच केली आहे. जिची किंमत 1 कोटी 19 हजार रुपयाच्या घरात असणार आहे. विविध वैशिष्ट्यांसह सदरची गाडी बाजारात लाँच करण्यात आली आहे. एलइडी हेडलॅम्प, 20 इंचाचे एम हलके अलॉय व्हील्स अशी वैशिष्ट्यो यात आहेत. पॅनारॉमिक सनरुफ, बोवर्स आणि विलकीन्स ऑडियो सिस्टम व एम लेदर स्टीअरिंग व्हील ही वैशिष्ट्योही यामध्ये पाहायला मिळतात. 83.9 केडब्ल्यूएचची बॅटरी यात दिली असून गाडी याअंतर्गत 516 किलोमीटरचे अंतर पार करु शकते, असा दावा कंपनीने केला आहे. व्रुझ कंट्रोलची सोय असण्यासोबतच स्मार्टफोनमार्फत गाडी स्मार्टपणे पार्क करण्याची व मागे घेण्याची व्यवस्था यात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.