For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीएमडब्ल्यूकडून नवीन कारचे सादरीकरण

06:14 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
बीएमडब्ल्यूकडून नवीन कारचे सादरीकरण
Advertisement

पेट्रोल-इलेक्ट्रिक कारचा समावेश : 912 किमीचे दमदार मायलेज

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

लक्झरी कार निर्माता बीएमडब्ल्यूने आपली नवीन 3 सिरीज सादर केली आहे. ही कंपनीच्या 3 सिरीजची आठवी पिढी आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे यावेळी पेट्रोल इंजिनसोबत पूर्णपणे इलेक्ट्रिक मॉडेल्सचाही समावेश करण्यात आला आहे. नवीन कारमध्ये बीएमडब्ल्यूच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

Advertisement

यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेली इलेक्ट्रिक बीएमडब्ल्यू आय3 (बीएमडब्लू आय 3) आहे, जी एका चार्जवर 912 किलोमीटरपर्यंत धावू शकते. त्याच वेळी, पेट्रोलवर चालणारी एम350 एक्सड्राइव्ह (एम350 एक्स ड्राईव्ह) केवळ 4.1 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग गाठू शकते.

बीएमडब्ल्यू 3 सिरीज इलेक्ट्रिक

आय3 50 एक्सड्राइव्ह (आय3 50 एक्स ड्राईव्ह) हे नवीन 3 सिरीजच्या इलेक्ट्रिक मॉडेल्सपैकी सर्वात खास मॉडेल आहे. ही कार 108.7 केडब्ल्यूएच  बॅटरीवर चालते आणि तिची कमाल डब्ल्यूएलटीपी रेंज 912 किमी आहे. ही कार 345 केडब्ल्यू म्हणजेच 469 हॉर्सपॉवर निर्माण करते.

बीएमडब्ल्यू आय3 40 एक्स ड्राईव्ह

बीएमडब्ल्यूने आय3 40 एक्स ड्राईव्ह सुद्धा लॉन्च केली आहे. यामध्ये 82.8 केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी असून, याची कमाल रेंज 710 किमी आहे.

बीएमडब्ल्यू एम 350 एक्स ड्राईव्ह पेट्रोल

बीएमडब्लू एम 350 एक्स ड्राईव्ह पेट्रोल मॉडेलमध्ये 3.0-लिटरचे सहा-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 48व्ही माइल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानाने समर्थित आहे. हे इंजिन 443 हॉर्सपॉवर म्हणजेच 326 किलोवॅट शक्ती निर्माण करते.

वैशिष्ट्यो...

?नवीन 3 सिरीजमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे.

?इलेक्ट्रिकमध्ये ‘हार्ट ऑफ जॉय’ नावाची एक नवीन कॉम्प्युटर सिस्टीम आहे.

?नवीन 3 सिरीजचे डिझाइन पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक बनवले आहे.

Advertisement
Tags :

.