महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्ल्यू स्टोन ज्वेलरीचा येणार आयपीओ,

06:01 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2 हजार कोटी उभारणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा आणि झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांची गुंतवणूक असणारी दागिन्याच्या क्षेत्रातील कंपनी ब्ल्यू स्टोन ज्वेलरी लवकरच आपला आयपीओ सादर करणार आहे.

सदरच्या आयपीओअंतर्गत कंपनी येणाऱ्या काळामध्ये 2 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याची माहिती आहे. कंपनीने 2022 मध्ये सार्वजनिक होण्याची योजना बनवली होती. पण त्यावेळेला ही योजना स्थगित केली गेली. या ऐवजी खाजगी इक्विटी फर्मच्या माध्यमातून कंपनीने पैशांची उभारणी केली. मागच्या वर्षी ब्ल्यू स्टोन ज्वेलरीने निखिल कामत, रंजन पै, अमित जैन, दीपिंदर गोयल आणि 360 वन अशा जुन्या आणि नव्या गुंतवणूकदारांकडून 550 कोटी रुपयांची रक्कम उभारली होती. यामुळे कंपनीचे निव्वळ मूल्यांकन 440 दशलक्ष डॉलर्स वर पोहोचले आहे. हिरो एंटरप्राईजेसचे सुनीलकांत मुंजाल यांच्या नेतृत्वाअंतर्गत 2022 मध्ये 30 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक ब्ल्यू स्टोन ज्वेलरीमध्ये केली गेली होती.

कंपनीची माहिती

टायटन कंपनीची सहकारी तनिष्क, कल्याण ज्वेलर्स यासारख्या कंपन्यांसोबत आता ब्ल्यू स्टोन ज्वेलरी उद्योगामध्ये विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. ब्ल्यू स्टोनच्या देशभरामध्ये 180 हून अधिक शोरूम्स आहेत. ब्ल्यू स्टोन ज्वेलरीने आार्च 2023 ला संपलेल्या वर्षात 771 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article