For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई पोलिसांच्या बंदोबस्ताची ब्ल्यु प्रिंट यशस्वी!

06:51 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबई पोलिसांच्या बंदोबस्ताची ब्ल्यु प्रिंट यशस्वी
Advertisement

कोणाची ब्ल्यु प्रिंट यशस्वी होऊ अगर न होवो. पण पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची बंदोबस्ताची ब्ल्यु प्रिंट मात्र यशस्वी झाली. कोणताही अनुचित प्रकार न घडता मुंबईतील लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम यशस्विरित्या पार पडला. एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी तर दुसरीकडे न भुतो न भविष्यती असा मुंबईत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो अशातच मुंबईत सुऊ असलेले आयपीएल सामने अशा क्लिष्ट परिस्थितीत फणसाळकर यांनी अगदी काटेकर नियोजन करत बंदोबस्ताची ब्ल्यु प्रिंट तयार करीत यशस्वी केली.

Advertisement

देशातील निवडणुकांचा महासंग्राम 1 जूनअखेर समाप्त होईल. सध्या देशातील प्रत्येक घटकाला वेध लागले आहेत ते निवडणूक निकालांचे. गेली महिनाभर विविध प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांनी दिलेल्या निवडणुकांचे अंदाज नेमके कशाप्रकारे असतील, याचे देखील वेध या वृत्तवाहिनी आणि प्रसारमाध्यमांना लागले आहेत. तर देशांत कोण बाजी मारणार, याची चर्चा शहरातील गल्लो-गल्लीत सुऊ आहेच मात्र गावो, गावच्या चावडीवर देखील याची चर्चा रंगू लागली आहे. या निवडणूक निकालांचा खऱ्या अथ &ने धसका घेतला आहे, तो या निवडणुकीत नशीब आजमाविणाऱ्या उमेदवारांनी. जोपर्यंत निवडणुकांचे निकाल समाधानकारक हाती येत नाही, तोपर्यंत या उमेदवारांना व्यवस्थित झोप लागणार नाही, हे कोणा ज्योतिषाने सांगण्याची आवश्कता नाही. तर दुसरीकडे या निवडणुका व्यवस्थित आणि सुरळीतपणे पार पाडण्याचे संपूर्ण श्रेय हे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे आहे. मुंबईतील निवडणुकांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, यासाठी त्यांनी बंदोबस्ताची ब्ल्यु प्रिंट तयार करीत ती यशस्वीरित्या पार पाडल्याने, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यावर कौतुकांचा वर्षाव सुऊ आहे.

पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी केलेले नियोजन आणि त्याची प्रत्येक अंमलबजावणी त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्याने, बंदोबस्तावर असलेला पोलीस अधिकारी-कर्मचारी वर्ग देखील आनंदित होता. कारण हा बंदोबस्त पार पाडत असताना प्रत्येक अधिकारी-कर्मचारी हा 48 तासाहून अधिक काळांपर्यत बंदोबस्तावर होता. मात्र या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडाही त्रस्तपणा नव्हता. याऊलट सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे चेहरे अगदी टवटवीत असल्याचे आढळून आले. तर याचे सर्व श्रेय हे पोलीस आयुक्तांना असल्याची भावना या अ]िधकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. कधी नाही ते राज्यात अनाकलनीय अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारमध्ये भाजप पक्षाबरोबर राष्ट्रवादी पक्षाचा एक गट तर शिवसेना पक्षाचा एक गट तर विरोधामध्ये काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी पक्षाचा एक गट आणि शिवसेना पक्षाचा एक गट असे समिकरण निर्माण झाले आहे. या सर्व पक्षातील उमेदवारांमध्ये निवडणूक होणार होती. राज्यातील अनाकलनीय अशी राजकीय परिस्थिती त्यात मुंबईसारख्या शहरात तर आणखी जटील परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र या सर्व परिस्थितीला पुऊन उरत पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बंदोबस्ताची ब्ल्यु प्रिंट तयार केली. त्यानुसार, अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताचे प्रशिक्षण देण्यास सुऊवात केली. त्यांचे वर्ग घेत आवश्यक त्या सूचना करण्यास सुऊवात केली.

Advertisement

त्याचप्रमाणे, न भुतो न भविष्यती असा मुंबई शहरात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार होता. तर दुसरीकडे आयपीएलचे सामनेदेखील मुंबईत सुऊ होते. या सर्व गोष्टी एकाचवेळी मुंबईत होणार असल्याने आहे त्या मनुष्यबळात सर्व कसरत करीत बंदोबस्ताचे शिवधनुष्य पेलण्याचे मोठे काम पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यावर होते. त्यानुसार, त्यांनी बंदोबस्ताची ब्ल्यु प्रिंट तयार करीत ती यशस्वीरित्या पार देखील पाडली. मतदानाच्या दिवशी बंदोबस्त सुऊ असताना देखील जेष्ठ नागरिक, अपंगांना मदत करण्याचे काम पोलीस अधिकारी-कर्मचारी करीत होते. मे महिन्यातील रखरखता उन्हाळा.. डोक्यावर आग ओकणारा सूर्यदेव आणी संपूर्ण शरीरात लागलेल्या घामाच्या धारा.. याची जरा देखील पर्वा न करता अधिकारी-कर्मचारी बंदोबस्ताचे काम करीत होते. ते ही अगदी अतिउत्साहाने. का? तर याचे नियोजन स्वत: पोलीस आयुक्तानी केले होते. त्यासाठी शहरातील अनेक ठिकाणी पोलीस आयुक्त फणसाळकर हे जातीने हजर राहुन नियोजन करीत होते.

राज्यातील निवडणुकांचा महासंग्राम शांततेत पार पाडण्याकरीता मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द कऊन, त्यांना बंदोबस्ताकरीता तैनात करण्यात आले होते. शहरातील सर्व मतदारसंघातील पोलीस आयुक्तांनी पाहणी केल्यानंतर तात्काळ या मतदासंघात 27 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिला. तसेच 5 अप्पर पोलिस आयुक्त, 25 पोलीस उपायुक्त, 77 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2 हजार 475 पोलीस अधिकारी देखील सज्ज झाले होते. प्रथम शहरातील सर्व भागात चोवीस तास गस्त वाढविण्यात आली. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता पोलिसांनी जे संशयीत आहेत, अशांची उचलबांगडी करण्यास सुऊवात केली. संपूर्ण शहरात मिशन ऑल आऊट राबविण्यात आले. जेणेकऊन, शहरात निवडणुकीच्या धामधुमीत या संशयीतांनी कोणताही अनुचित प्रकार घडवू नये, याकरीता पोलिसांनी प्रथमच ही काळजी घेण्यास सुऊवात केली. तसेच शहरात सर्वात जास्त सुऊ असलेल्या अंमली पदार्थाच्या तस्करांवर लक्ष केंद्रीत कऊन त्यांना अटक केली. विदेशातून शहरात येणाऱ्या खास विदेशी पाहुण्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत करण्यास सुऊवात केली. एखादी संशयीत विदेशी व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन हॉटेल मालक, गेस्ट हाऊस मालकांना केले होते.

पोलीस आयुक्तांचे मार्गदर्शन अ]िण नेतृत्वामुळे शहरातील सर्व निवडणुका अगदी  शांततेत पार पडल्याने, पोलिसांनी एकच निश्वा:स सोडला. कर्तव्य बजावित असताना कुटुंबाची असलेली जबाबदारी, त्यांच्या समस्या आदी बाबींकडे कानाडोळा करीत, केवळ नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता, तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरीता पोलिस दलाने डोळ्यात तेल घालून चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे काही समाजकंटकांना मनात असताना देखील विध्वंस घडविता आला नाही. कारण काही अनुचित प्रकार करीत असताना सापडल्यास, मुंबई पोलीसांचा हिसका कसा असतो, याची कल्पना या समाजकंटकांना आहे. यामुळे काही अनुचित करण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीला शांततेने सामोरे जाणे यातच शहाणपण असल्याचा समज कऊन, घेऊन, या समाजकंटकांनी देखील माघार घेतली. अखेर याचे सर्व काही श्रेय हे मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे आहे.

- अमोल राऊत

Advertisement
Tags :

.