महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओडिशात भाजपला झटका, महिला नेत्याचा बिजदप्रवेश

06:42 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

Advertisement

भाजपला झटका देत पक्षाच्या ओडिशा शाखेच्या उपाध्यक्ष लेखाश्री सामंतसिंघर यांनी राजीनामा दिला आहे. लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला हा मोठा धक्का आहे. लेखाश्री यांनी बिजू जनता दलात प्रवेश केला आहे.

Advertisement

लेखाश्री यांच्यापूर्वी भृगु बक्सीपात्रा यांनी भाजपला रामराम ठोकत बिजू जनता दलात प्रवेश केला होत. बक्सीपात्रा हे देखील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष होते. नेतृत्वाचा विश्वास संपादित करण्यासाठी अपयशी ठरल्यानेच भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचे लेखाश्री यांनी ओडिशा भाजप अध्यक्ष मनमोहन सामल यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मागील 10 वर्षांपासून भाजपसाठी मी रक्त अन् घाम गाळला आहे. परंतु पूर्ण प्रामाणिकपणे आणि कठोर मेहनत करुनही मी नेतृत्वाचा विश्वास मिळवू शकले नाही. यामुळे माझ्याकडे आणखी काही करण्यासाठी काहीच शिल्लक नसल्याचे मानणे आहे. याचमुळे ओडिशाच्या लोकांची सेवा करण्याची माझी इच्छा पूर्ण होत नाही असे लेखाश्री यांनी पत्रात नमूद केले आहे.

लेखाश्री यांनी बिजद खसदार मानस मंगराज आणि सस्मिता पात्रा यांच्या उपस्थितीत राज्यातील सत्तारुढ पक्षात प्रवेश केला आहे. बिजदने अद्याप बालासोर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेला नाही. हे पाहता लेखाश्री यांना तेथील उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article