For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime | सांगलीत वाढदिवसाच्या पार्टीत रक्तरंजित थरार; मित्राला वाचवायला गेला अन् कोयत्याचा वार थेट मानेवर बसला!

12:53 PM Jun 07, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   सांगलीत वाढदिवसाच्या पार्टीत रक्तरंजित थरार  मित्राला वाचवायला गेला अन् कोयत्याचा वार थेट मानेवर बसला
Advertisement

सांगली :वाढदिवसाच्या आनंदोत्सवाला क्षणार्धात हिंसक - बळण लागल्याने हनुमाननगर परिसरात रक्तरंजित थरार घडला. दारूच्या नशेत जुना बाद उफाळून - आल्याने एका तरुणाने कोयत्याने बार करत प्राणघातक हल्ला केला. यात अक्षय जयवंत निकम (बय २७, मुसळे प्लॉट, डी-मार्ट पाठीमागे) - गंभीर जखमी झाला त्याच्या मानेवर खोलवर वार झाल्याने अतिदक्षता -विभागात उपचार सुरू आहेत.

Advertisement

रितेश सकटे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रमंडळी हनुमाननगर मधील क्लाससमोर जमली होती. रात्रीच्या फडके सुमारास सुरू असलेल्या मद्यपानाच्या पार्टी दरम्यान रितेश सकटे आणि दीपक गंगापा ऐबळे (गुलाब कॉलनी)यांच्यात जुन्या वादातून शा‍ब्दिक चकमक उडाली. याचे रूपांतरकाही क्षणांतच हिंसाचारात झाले.

संतापलेल्या दीपकने कोयता उपसून रितेशवर बार करण्याचा प्रयत्न केला.मात्र मित्राला वाचवण्यासाठी अक्षय
निकम मध्ये पडला आणि त्याच क्षणी कोयत्याचा बार थेट त्याच्या मानेवर बसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अक्षयला रुग्णालयात दाखल केले. विश्रामबाग पोलिसांनी संशयित दीपक ऐवळेला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.