Satara Crime | पांढरवाडीत रक्ताचा सडा! विळा आणि लोखंडी रॉडने दोन भावांवर जीवघेणा हल्ला
उंब्रज जवळ किरकोळ वादातून दोन भावांना संपवण्याचा प्रयत्न
उंब्रज : तारळे विभागातील पांढरवाडी गावात किरकोळ वादातून उफाळलेल्या वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तक्रारदार धनाजी वाल्मिक घाडगे (वय ३७) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या भावालाही मारहाण करण्यात आली आहे. उंब्रज पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.४५ वाजता पांढरवाडी येथे ही घटना घडली. धनाजी घाडगे हे आपला भाऊ तानाजी यांच्यासह पूर्वी झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी प्रवीण लक्ष्मण मुसळे व प्रताप लक्ष्मण मुसळे यांच्याकडे गेले होते. मात्र बोलाचाली दरम्यान बाद चिघळत गेला आणि त्याचे रूपांतर थेट हल्ल्यात झाले. तक्रारीनुसार, प्रताप मुसळे याने बिळा घेऊन तानाजी यांच्या अंगावर धाव घेतली. त्यावेळी धनाजी यांनी मध्यस्थी करत असताना प्रतापने आता तुम्हाला जिवंत ठेवत नाही, अशी धमकी देत त्यांच्या डोक्यावर विळ्याने बार केला. हा बार धनाजी यांनी हाताने अडवला असता तो त्यांच्या डाव्या खांद्यावर व कोपराजवळ बसला.
त्याचवेळी प्रवीण मुसळे याने लोखंडी रॉडने धनाजी यांच्या उजव्या डोळ्याच्या बरच्या भागावर प्रहार केला. तसेच दोघांनाही जिवंत ठेवायचे नाही, असे म्हणत प्रवीण मुसळे याने तानाजी यांच्याडोक्यात लोखंडी रॉडने बार केला. ज्यामुळे ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. त्यानंतर धनाजी यांच्या पोटावर, छातीवर व पाठीवर विळ्याने वार करण्यात आले. प्रताप मुसळे यानेही कोयता व लोखंडी रॉडने धनाजी यांच्या पायांवर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत घटनास्थळावरून पळ काढला आहे.
याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पांढरवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले करत आहेत. आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्याची माहिती पोलिसांवतीने देण्यात आली आहे.