For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वादूपिंड, यकृत अन् स्नायूद्वारे ठरते शर्करेची स्थिती

07:00 AM Apr 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वादूपिंड  यकृत अन् स्नायूद्वारे ठरते शर्करेची स्थिती
Advertisement

25 लाख लोकांच्या जेनेटिक डाटातून खुलासा

Advertisement

टाइप-टू मधुमेहाला आतापर्यंत प्रामुख्याने रक्तातील शर्करेच्या स्तराशी जोडून पाहिले जात राहिले आहे, परंतु आता एका मोठ्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक अध्ययनाने हा विचार पूर्णपणे बदलला आहे. जगभरात 25 लाख लोकांच्या आनुवांशिक आकडेवारीच्या विश्लेषणातून वैज्ञानिकांना या आजाराचे बहुतांश जैविक कारणे रक्तात नव्हे तर शरीराच्या अन्य महत्त्वपूर्ण अवयव म्हणजेच स्वादूपिंड, यकृत, स्नायू आणि चरबीयुक्त पेशींमध्ये लपलेली असतात, असे आढळून आले आहे.

संशोधनानुसार मधुमेहाशी निगडित सुमारे 85 टक्के महत्त्वपूर्ण जीन रक्त चाचणीत दिसून येत नाहीत. टाइप-टू मधुमेह आता जगातील सर्वात सामान्य आजारांमध्ये सामील असून कोट्यावधी लोक यामुळे प्रभावित आहेत. सर्वसाधारणपणे याचे निदान रक्तातील ग्लूकोजच्या प्रमाणामुळे केले जाते, जे आवश्यक तर आहे, परंतु आजाराचे पूर्ण चित्र समोर आणत नाही. नव्या जागतिक अध्ययनानुसार टाइप-टू मधुमेह केवळ रक्ताची समस्या नव्हे, तर पूर्ण शरीराशी निगडित जटिल विकार आहे.

Advertisement

या आजारात स्वादूपिंडात पुरेसे इन्सुलिन निर्माण होत नाही, स्नायू इन्सुलिनचे योग्य वापर करू शकत नाहीत, यकृत गरजेपेक्षा अधिक ग्लूकोज निर्माण करू लागते आणि फॅट टिश्यूमध्येही असंतुलन निर्माण होते. जर तपासणी केवळ रक्तापर्यंत मर्यादित राहिली तर या अवयवांमध्ये होत असलेली गडबड समोर येऊ शकत नाही. हे मोठे आंतरराष्ट्रीय अध्ययन अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ मॅसाच्युसेट्स एमहर्स्ट आणि जर्मनीच्या हेल्महोल्ट्ज म्युनिचच्या वैज्ञानिकांच्या नेतृत्वात करण्यात आले. याचे निष्कर्ष प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिक मेटाबोलिज्ममध्ये प्रकशित करण्यात आले आहेत.

25 लाख लोकांच्या डाटाचे विश्लेषण

संशोधकांनी युरोप, आफ्रिका, अमेरिका आणि पूर्व आशिया समवेत विविध क्षेत्रांमधून प्राप्त 25 लाख लोकांच्या जेनेटिक डाटाचे विश्लेषण केले. वैज्ञानिकांनी मधुमेहाशी निगडित शरीराच्या 7 वेगवेगळ्या पेशींचे अध्ययन केले, ज्यात स्वादूपिंड, यकृत, स्नायू आणि चरबीयुक्त पेशी सामील होती. या प्रक्रियेत टाइप-टू मधुमेहाशी निगडित एकूण 676 जीन्स ओळखली गेली. यातील केवळ सुमारे 18 टक्के जीन असे होते, जे रक्तातही दिसून आले. म्हणजेच जवळपास 85 टक्के आवश्यक जेनेटिक संकेत रक्तचाचणीत अजिबात दिसून येत नाहीत.

वेगवेगळ्या वंशांचा अध्ययनात समावेश

या अध्ययनात विविध देश आणि वंशाच्या लोकांना सामील करण्यात आले. पूर्वी बहुतांश आनुवांशिक संशोधन युरोपीय लोकसंख्येपर्यंत मर्यादित राहायची. परंतु यावेळी आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेच्या लोकांचा डाटाही जोडण्यात आला. निष्कर्षांमधून काही जीन सर्व समुदायांमध्ये मधुमेहाशी निगडित आढळून आले.तर अनेक जोखिम जीन केवळ तेव्हाच समोर आले, जेव्हा बिगर युरोपीय लोकसंख्येला विश्लेषणात सामील करण्यात आले. यातून जगातील विविध लोकसंख्येला संशोधनात स्थान न देण्यात आल्यास आजाराची वास्तविक समज अपूर्णच राहणार हे स्पष्ट झाले.

Advertisement
Tags :

.