कपिलेश्वर मंदिरतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद
मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन
बेळगाव : दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. 75 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमामध्ये मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे यांच्या हस्ते पूजा करून रक्तदान शिबिराला चालना देण्यात आली. मंदिरतर्फे गरजू लोकांसाठी रक्त मिळावे यासाठी रक्तगट नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावेळी दीडशेहून अधिक जणांनी नोंदणी केली होती. केएलई ब्लड बँकेच्यावतीने रक्त संकलन करण्यात आले. यावेळी सचिव अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, राजू भातकांडे, अजित जाधव, राकेश कलघटगी, प्रथमेश कावळे, जोतिबा कावळे, अविनाश खन्नूकर, अभय लगाडे, प्रताप बाचोळकर यासह इतर उपस्थित होते. मंदिराच्या वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. अमर हुंदरे व सर्वेश चव्हाण यांनी तयार केलेल्या वेबसाईटविषयी अभिजीत चव्हाण यांनी माहिती दिली. भाविकांना मंदिराविषयी ऑनलाईन माहिती मिळावी यासाठी मराठी, हिंदीसह इतर भाषांमध्ये ही वेबसाईट असल्याचे सांगण्यात आले.