For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘लोकमान्य’तर्फे रक्तदान शिबिर

12:16 PM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘लोकमान्य’तर्फे रक्तदान शिबिर
Advertisement

रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement

बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला लोकमान्य सोसायटीच्या कर्मचाऱ्यांसह बेळगावमधील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. 100 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाला केएलई ब्लड बँकेचे डॉ. श्रीकांत विरगी, डॉ. विठ्ठल माने यांच्यासह लोकमान्य सोसायटीचे व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजित दीक्षित या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली.  लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते.

यावेळी बोलताना डॉ. श्रीकांत विरगी म्हणाले, लोकमान्य परिवाराकडून दरवर्षी हा उपक्रम राबवून अनेक गरजूंपर्यंत रक्ताचा पुरवठा केला जात आहे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तींनी रक्तदान करून इतरांचा जीव वाचविण्यासाठी सहकार्य करावे, असे विचार त्यांनी मांडले. केएलई ब्लड बँकेच्यावतीने रक्तसंकलन करण्यात आले. पंढरी परब यांनी लोकमान्य सोसायटीच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत लोकमान्यने अनेक विधायक उपक्रमातून सामाजिकता जपण्याचे कार्य केल्याचे सांगितले. सर्वप्रथम लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब व सुबोध गावडे यांनी रक्तदान करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला.

Advertisement

रक्तदात्यांचा सत्कार

127 वेळा रक्तदान केल्याने बेळगाव महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी संजय पाटील यांनी लोकमान्य सोसायटी आयोजित रक्तदान शिबिरावेळी 128सावे रक्तदान करून रक्तदानाविषयी जागृती केली. रक्तदानाचे फायदे तसेच इतरांचा जीव कसा वाचू शकतो याविषयी त्यांनी माहिती दिली. यानिमित्ताने लोकमान्य सोसायटीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पीआरओ सत्यव्रत नाईक यांनी केले.

Advertisement
Tags :

.