For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवजयंतीच्या औचित्याने चिंचवडे येथे रक्तदान शिबिर; महिलांचाही उत्स्फुर्त सहभाग

06:38 PM Feb 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
शिवजयंतीच्या औचित्याने चिंचवडे येथे रक्तदान शिबिर  महिलांचाही उत्स्फुर्त सहभाग
Chinchwade Blood donation camp
Advertisement

कळे / वार्ताहर

सालाबाद प्रमाणे याहिवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जय हनुमान कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चिंचवडे यांचेवतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले ज्यामध्ये महिलांचाही सहभाग होता.

Advertisement

सलग तिसऱ्या वर्षी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शासकीय रक्तपेढी सी. पी. आर. हॉस्पिटल यांचेकडून रक्त संकलन करण्यात आले. यावेळी रक्तपेढीचे डॉ. केदार सर, जनसंपर्क अधिकारी श्री कदम सर तसेच त्यांची सर्व टीम हजर होती. मंडळाचे अध्यक्ष श्री विठ्ठल पाटील व उपाध्यक्ष श्री गणेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य व सर्व ग्रामस्थ कार्यक्रमासाठी हजर होते.

Advertisement
Advertisement

.