For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime | तुमच्या घरीही पार्सल येतंय मग सावधान? डिलिव्हरी बॉयच्या 'त्या' एका सिक्रेट प्लॅनचा साताऱ्यात पर्दाफाश; वाचून अंगावर येईल काटा...

03:09 PM Jun 23, 2026 IST | NEETA POTDAR
satara crime   तुमच्या घरीही पार्सल येतंय मग सावधान  डिलिव्हरी बॉयच्या  त्या  एका सिक्रेट प्लॅनचा साताऱ्यात पर्दाफाश  वाचून अंगावर येईल काटा
Advertisement

सातारा -सातारा शाहूनगर परिसरातील आमराई कॉलनी येथील शिवालय अपार्टमेंटमधील बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरणारा सराईत घरफोड्या आरोपीला सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी ब्लिंकीट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून, पार्सल वितरण करताना बंद घरे हेरून घरफोड्या करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Advertisement

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ जून रोजी दिवसाढवळ्या शिवालय अपार्टमेंटमधीलएका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकआरोपीचा शोध घेत होते. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना एका संशयिताची माहिती मिळाली. मात्र, तो सतत ठिकाणे बदलत असल्याने त्याचा माग काढणे अवघड झाले होते. डी.बी. पथकाने दोन दिवस आरोपीवर गुप्तपणे पाळत ठेवली होती. पहाटेच्या सुमारास तो चारचाकी वाहनातून जात असताना पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केल्याने पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाकडून मिळालेल्या पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण १३ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ओंकार नरेश बाबर (वय ३०, रा.सध्या दिव्यनगरी, पार्ट कॉर्नरच्या पाठीमागे शाहूपुरी, सातारा, मूळ रा. उडतारे, ता. बाई जि. सातारा) असे आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पोलीस नाईक पंकज मोहिते तसेच डी.बी. पथक व सायबर विभागातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.