जबलपूरच्या ऑर्डनन्स फॅक्ट्रीत स्फोट, 2 ठार
13 कर्मचारी जखमी : दुर्घटनेच्या कारणांचा घेतला जातोय शोध
वृत्तसंस्था/ जबलपूर
मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील ऑर्डनन्स फॅक्ट्रीच्या एफ6 विभागात मंगळवारी सकाळी पिच्योरा बॉम्बला बॉयल्ड आउट करताना विस्फोट झाला आहे. या स्फोटात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. स्फोटामुळे इमरातीत 12-13 जण काम करत होते. दुर्घटनेत हे सर्व जण जखमी झाले आहेत सर्व जखमींना महाकौशल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तर स्फोटाच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली अनेक कर्मचारी अडकून पडल्याची भीती व्यक्त होत आहे. तेथे मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. ऑर्डनन्स फॅक्ट्री खमरियामध्ये मंगळवारी सकाळी 10.45 वाजता एफ6 विभागाच्या इमारत क्रमांक 201 मध्ये विस्फोट झाला. फॅक्ट्रीच्या या इमारतीत थाउजेंड पावडर बॉम्बची निर्मिती होती. या बॉम्बचा वापर भारतीय वायुदलाकडून केला जातो. तर दुर्घटनेमुळे पूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली आहे. प्रशासन स्थितीवर नजर ठेवून आहे. तर दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
जबलपूर ऑर्डनन्स फॅक्ट्रीची स्थापना ब्रिटिश शासनकाळात झाली होती. भारतीय सैन्यासाठी शस्त्रास्त्रs आणि दारुगोळ्याची निर्मिती करणे हा यामागील उद्देश होता. स्वातंत्र्यानंतर या फॅक्ट्रीचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि हा विभाग भारत सरकारच्या अधीन करण्यात आला होता.