For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mangalwedha Road Accident | मंगळवेढा-सांगोला रोडवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; शेणे येथील माय-लेकाचा जागीच मृत्यू, ३ जखमी

11:34 AM Jun 10, 2026 IST | NEETA POTDAR
mangalwedha road accident   मंगळवेढा सांगोला रोडवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात  शेणे येथील माय लेकाचा जागीच मृत्यू  ३ जखमी
Advertisement

Advertisement

ईश्वरपूर -मंगळवेढा सांगोला रोडवर झालेल्या भीषण अपघातात शेणे (ता बाळबा) येथील एकाच कुटुंबातील दोघे ठार तर बडील, सून व पुतण्या असे तिघे गंभीर जखमी झाले. मृतामध्ये आई व मुलाचा समावेश आहे. शेणे तालुका बाळवा येथील अशोक तुकाराम पाटील, सुरज अशोक पाटील, आई शारदा अशोक पाटील, सून नीता सुरज पाटील, नातू आयुष अंकुश पाटील हे हैदराबाद येथील आपल्या मुलाकडे गेले होते. हे सर्वजण सोमवारी आपल्या गावी परत येत असताना सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान सांगोला मंगळवेढा रोडवर मंगळवेढा पास करून अंधळगावच्या पुढे माळवाडी येथे चार चाकी गाडीने जेसीबीला जोरदार धडक मारल्याने गाडीचा चुरा झाला हे सर्वजण चार चाकी गाडीतून प्रवास करत होते.

यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण होते, मुलगा, आई, वडील, सून एक लहान मुलगा असे पाच जण होते, यामध्ये सुरज अशोक पाटील (वय ३२) आई शारदा अशोक पाटील (वय ५५), आई व मुलगा या मायलेक जागीच मृत्यू झाला. मुलाचे वडील अशोक तुकाराम पाटील (वय ६०) व लहान पुतण्या आयुष अंकुश पाटील (वय८) गाडीला जोरदार धडक बसल्याने दरवाजातून बाहेर फेकले गेल्याने ते वाचले व सून नीतासुरज पाटील (वय २८) गाडीच्या मधल्या शीटमध्ये अडकली होती त्यांनाही सुखरूपपणे बाहेर काढले.

Advertisement

त्यांना तत्काळ सांगोला येथील गवळी हॉस्पिटल येथे दाखल केले. त्यानंतर पोलीस व बाहतूक अधिकारी, कर्मचारी आले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सोमवारी मृत सुरज व आई शारदा त्यांच्यावर शेणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत सुरजचा व नीताचा नुकताच बिबाह झाला होता. त्याला सव्वा महिनाही पूर्ण झालेला नसताना अपघातात सुरजचा मृत्यू झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.