लवकरच येणार ‘ब्लॅक वॉरंट’
सीरिजचा ट्रेलर जारी
सेव्रेड गेम्स यासारख्या सीरिजची निर्मिती करणारा विक्रमादित्य मोटवानी आता एक जेल ड्रामा सीरिज ब्लॅक वॉरंट घेऊन येणार आहे. याचा दमदार टीजर नेटफ्लिक्सवर जारी करण्यात आला आहे. याचबरोबर याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
ही सीरिज सुनील गुप्ता आणि सुनेत्रा चौधरी यांचे पुस्तक ‘ब्लॅक वॉरंट : कन्फेशन्स ऑफ ए तिहार जेलर’वर आधारित आहे. यात एक जेलर सुनील गुप्ता यांचा लिहिला गेला आहे. याच्या कहाणीला ओटीटीवर दाखविण्याची जबाबदारी विक्रमादित्यने उचलली आहे. या बहुप्रतीक्षित सीरिजचा टीजर जारी करण्यात आला आहे.
टीजरची सुरुवात सुनील गुप्ता यांच्या मुलाखतीद्वारे होते. ज्यात ते जेलरच्या नोकरीचे महत्त्व सांगत ही समाजातील सर्वात महत्त्वपूर्ण नोकरीपैकी एक असल्याचे म्हणत असताना दिसून येतो. यानंतर तुरुंगात का मकरण्यासाठीचा त्यांचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. सुनील कुमार गुप्ता स्वत:ला कशाप्रकारे प्रभावी जेलर सिद्ध करणार हे या सीरिजमध्ये दर्शविले जाईल. ब्लॅक वॉरंट ही सीरिज 10 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.