शॉक लागून सोनावळीत ‘ब्लॅक पँथर’ ठार
12:13 PM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
धारबांदोडा : सोनावळी येथील दूधसागर देवस्थानाच्या बाजूला असलेल्या ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून ब्लॅक पॅंथर दगावल्याची घटना घडली आहे. सदर घटना रविवारी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान घडली असून दगावलेला बिबट्या हा नर असून अंदाजे अडीच ते तीन वर्षांचा असल्याची माहिती मोले वन्यजीव विभागाचे अधिकारी सिद्धेश नाईक यांनी दिली. सिद्धेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्या एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारत असतो. कदाचित अशाच प्रयत्नात त्याने थेट ट्रान्सफॉर्मरच्या वरच्या भागात उडी घेतल्याने विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे बिबट्याने ट्रान्सफॉर्मवर उडी घेतल्याने ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट झाल्याने वीज खंडित राहिली, अशी माहिती त्यांनी दिली.
Advertisement
Advertisement