For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad Crime | तरुणाईला नशेच्या जाळ्यात ओढणारे 'ते' इंजेक्शन! सासरा-जावयाची जोडी पोलिसांच्या जाळ्यात कशी अडकली?

04:03 PM May 15, 2026 IST | NEETA POTDAR
karad crime   तरुणाईला नशेच्या जाळ्यात ओढणारे  ते  इंजेक्शन  सासरा जावयाची जोडी पोलिसांच्या जाळ्यात कशी अडकली
Advertisement

                             म्हशीच्या गोठ्यातून सुरू होता नशेच्या औषधांचा गोरखधंदा

Advertisement

कराड: सैदापूर (ता. कराड)येथे म्हशीच्या गोठ्यातून तरुणांना नशेसाठी औषधाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या सासरा व जावयाला पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले. या कारवाईत मिफेन्टर्मिन सल्फेट या इंजेक्शनच्या २६ बॉटलसह मोबाईल असा सुमारे ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुरेश नंदू कटरे (वय ६३ रा. सैदापूर) व जावई विकास भगवान सातपुते (वय ४० रा. सिद्धीविनायक कॉलनी, सैदापूर) यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीवायएसपी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना मिळालेल्या गोपनीय महितीनुसार गुन्हे प्रकटीकरणने ही कारवाई केली.सैदापूर गावातील हॉटेल साईगार्डनच्या पाठीमागे लिबर्टी शॉपजवळील म्हशीच्या गोठ्यातून नशेसाठी बापरल्या जाणाऱ्यामिफेन्टर्मिन सल्फेट इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री सुरू होती.

Advertisement

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय ही इंजेक्शने तरुणांना विकली जात असल्याची माहिती समोर आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान सुरेश कटरे हा जावई विकास सातपुतेच्या सांगण्यावरून ३७९ रुपयांचे इंजेक्शन तब्बल १२०० रुपयांना विकताना आढळून आला. पोलिसांनी तातडीने दोघांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला.

Advertisement
Tags :

.